पुणे-छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून शिवाजीनगर पुणे येथे एस.एस.पी. एम.एस. संस्थेच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या स्मारकास अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिव-जन्मोत्सवा निमित्ताने शिवरायांचा पाळणा, पोवाडे, पालखी सोहळा आयोजित करण्यात आले होते. वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचे व्रत अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने पाळले असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.. समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी प्रास्थाविक केले. मालोजीराजे छत्रपती कोल्हापूर संस्थान यांनी जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, विकास पासलकर यांनी पालखीला आणली . छत्रपती शिवरायांनी तळागाळातील माणसांना स्वराज्याच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. हाच आदर्श समोर ठेऊन भिक्षेकरी डॉ.अभिजित सोनवणे यांच्या प्रयत्नातून भीक मागणे सोडून वेगवेगळ्या व्यवसायात आलेल्या भिक्षेकऱ्यांच्या सोबत आम्ही या वर्षीची शिवजयंती साजरी केली. या सर्व भिक्षेकऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने परत आयुष्यात कधीही भीक न मागण्याची शपथ यावेळी घेतली, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्मृतिशेष स्वप्नील कोलते यांची मुलगी गाथा स्वप्नील कोलतेला शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला. आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिजाऊंचे वंशज अमरसिंह जाधवराव, बार कौन्सिल अध्यक्ष सुधीर मुळीक, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, विराज तावरे, जितेंद्र साळुंखे, राजाभाऊ पासलकर, दत्ताभाऊ पासलकर, मंदार बहिरट, युवराज ढवळे व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. सौ.स्नेहल पायगुडे यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली तर सौ.बनबरे ताईंनी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
शिवविचार जगभर पोहीचविण्यासाठी विश्वव्यापी शिवजयंती करण्यासाठी कटिबद्ध राहू
Previous article
Next article
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी
मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...
लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा
महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.मुंबई...
इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर
नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...
मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला
मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

