पुणे-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय विद्वत्तेचा वारसा देशभरात पोहचवण्यासाठी
पाटना ( बिहार) येथे 29 फेब्रुवारी ते 2 मार्च रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानममालेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत .
शिवछत्रपती स्मारक ( कर्नाटक) यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष कर्नाटकचे माजी आमदार अँड. एम. जी. मुळे व संयोजक डॉ. एल. बी. सिन्हा आहेत. असे व्याख्यानमालेचे मुख्य आयोजक जनार्दन पाटील यांनी सांगितले.
आज शुक्रवारी ( दि. 20 ) हिंगणे खुर्द विठ्ठलवाडी येथे शिवकालीन विठ्ठल मंदिरात माजी उपमहापौर, नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या हस्ते पुणेकरांच्या वतीने शिवरायांचे दुर्मिळ चित्र देऊन पाटील यांचा
सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रा बाहेर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्याचे निमंत्रण छत्रपती शिवाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांच्या वंशजांना देण्यासाठी पाटील हे महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी सिंहगड ,राजगड तोरणा भागातील मावळ्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.
जनार्दन पाटील म्हणाले, व्याख्यानानमालेत पुण्यातील इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांचे प्रमुख व्याख्यान होणार आहे. मावळ्यांचे वंशज व वारकरी सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळा पासुन पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, ओरीसा, बिहार आदी राज्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज स्थायिक झाले आहेत. 17 07 मध्ये मराठ्यांनी छोटा नागपूर (बिहार ) हे स्वतंत्र राज्य स्थापन केले. शिवकाळा पासुन या रस्त्यात मराठा समाज आहे .