अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे: हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत प्रांजल सातपुते, अनुश्री वैरागडे, पूर्वा मुंडाळे यांनी १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पूर्वा मुंडाळेने जेनिशा नागवाणीवर १५-६, १५-४ असा, तर अनुश्री वैरागडेने प्रणाली डोईफोडेवर १०-१५, १५-६, १५-१३ असा, तर प्रांजल सातपुतेने ईरा कुलकर्णीवर १५-७, १५-६ असा विजय मिळवला. प्राजक्ता गायकवाडने आरोही जोगळेकरला १५-९, १५-११ असे, तर राधा गाडगीळने चौथ्या मानांकित जुई जाधवला १५-११, १५-१३ असा धक्का दिला. पूर्वा वाडेकरने अंजली कुलकर्णीला १५-१३, १५-६ असे, शर्वरी सुरवसेने अलिशा आव्हाडला १५-१३, १५-१३ असे नमविले.
श्रेयस, सार्थकची आगेकूच
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत दुसऱ्या मानांकित सार्थक पाटणकरने वेद घारडेवर १५-४, १५-४ असा, ईशान आगाशेने प्रतिबिंब जैनवर १५-१३, १५-१० असा, तर अर्जुन देशपांडेने शर्वील जुमदेवर १५-१, १५-६ असा विजय मिळवला. मिहीर जोशीने वीनित खाडिलकरला १५-१०, १५-१० असे, ओम दरेकरने ऋग्वेद भोसलेला १५-११, १५-९ असे, ऋषभ दुबेने वरद लांडगेला १७-१५, ७-१५, १५-७ असे नमविले. अरविंद हजारेने तेजस खरेवर १५-११, १५-१० अशी, श्रेयस लागूने माहिराज राणावर १५-१२, १२-१५, १५-७ अशी, आदित्य शिंदेने अद्वैत अभ्यंकरवर १५-५, १५-५ अशी मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.
निकाल :
पुरुष एकेरी – दुसरी फेरी – विनीत कांबळे वि. वि. सौरव ठाकूर १५-३, १५-९; जयंत कुलकर्णी वि. वि. हृषीकेश खाडिलकर १९-१७, १५-१२; अथर्व चव्हाण वि. वि. नितिश जाधव १५-८, १५-५; विपूल अन्वेकर वि. वि. किरण पाटील १५-७, १५-६; ओंकार साळकर वि. वि. प्रथमेश बेलदरे १५-१०, १४-१६, १५-९; वेंकटेश अगरवाल वि. वि. मिमांशू गोगोई १५-९, १५-११; जयेश महाजन वि. वि. ऋत्विक वाळिंबे १५-५, १५-५; शौनक कुलकर्णी वि. वि. सुशांत पाटील १५-८, १५-९; अभिजित कदम वि. वि. आनंद साबू १५-६, १५-४; चिराग भगत वि. वि. हर्षल जानेराव १५-९, १५-१०; प्रतीक धर्माधिकारी वि. वि. गणेश जाधव १५-३, १५-३.
११ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – मिहीर इंगळे वि. वि. अनिर्वान भुतळा १५-६, १५-८; अनय इंगळहळीकर वि. वि. वेद अकोलकर १५-७, १२-१५, १५-११; अन्वय उरुणकर वि. वि. सिद्धान्त बराटे १५-१०, १४-१२; शर्मन सपकाळ वि. वि. समर आगाशे १५-९, १५-८; दियान पारेख वि. वि. सुधान्व कुलकर्णी १५-६, १५-३; अनुज भोसले वि. वि. पार्थ पाटील १५-१२, १५-३; अन्वय समग वि. वि. कबिर तांबे १५-३, १५-६; शौर्य खरात वि. वि. आरव मारणे १५-४, १५-५.
१३ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – मिहीर कोकीळ वि. वि. अथर्व गवळी १५-२, १५-४; समर जोशी वि. वि. सहर्ष आंबेकर १५-१२, ९-१५, १५-१२; ध्रुव भोळे वि. वि. अयांश यारगट्टी १५-६, १५-१२; अधिराज गांगुर्डे वि. वि. रेयश चौधरी १५-९, १५-९; आरुष अरोरा वि. वि. अर्जुन श्रीगडिवार १५-८, १५-११; ध्रुव बर्वे १५-६, १५-११; ईशान राजे वि. वि. रियान करंदीकर १५-५, १५-१२.
१३ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – सोयरा शेलार वि. वि. पार्थी कुमावत १५-१, १५-२; मुद्रा मोहिते वि. वि. रेवा सुभेदार १५-४, १५-२; सानिका देशपांडे वि. वि. उत्कर्षा शर्मा १५-६, १५-५; सानिका बागले वि. वि. वीरा पानसे १५-११, १५-११; आयुषी मुंडे वि. वि. रिधिमा जोशी १५-९, १५-९; स्वरा शाळिग्राम वि. वि. मिहिका पाठक १५-७, १५-९; आराध्या ढेरे वि. वि. रिया डिचोळकर १५-११, १५-८; अनुशा सुजान वि. वि. चारुता गोडबोले १५-२, १५-६.