Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारतात प्रथमच कचरावेचकांना 15 रुपये हमीभाव

Date:

पर्यावरणप्रेमी संस्थां आणि कचरा वेचक यांच्या 
वतीने ई – वेस्ट संकलनास प्रारंभ
पुणे  : कचरावेचकांकडून संकलित झालेल्या ई- वेस्टला प्रथमच प्रति किलो15 रु. तर टाकाऊ प्लास्टिक ला 5 रु.हमी भाव देण्यात आला आहे. गोळा झालेल्या ई- वेस्टवर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. धायरी व मुळशी येथे कचरावेचकांकडून 218 किलो ई- वेस्ट गोळा झाले आहे.
धायरी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश म्हस्के, अनिल मिसाळ, महादेव कसबे, अमोल कसबे या कचरावेचकांना ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’चा परवाना देण्यात आला. यावेळी ‘एन्व्हारर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’चे नीलेश इनामदार, ‘वनराई’चे रवींद्र धारिया, ‘क्लीन गार्बेज’चे विलास पोकळे, ‘जनाधार’चे ललित राठी, पर्यवेक्षक सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.
कचरावेचकांकडून ई- वेस्ट गोळा केले जात आहे. याकरिता मुळशी येथे अभियान राबविण्यात आले. ‘एन्व्हारर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’,​’​वनराई​’​,​’​जन आधार​’​,​’क्लीन गार्बेज​’​आणि​’​लायन्स क्लब​’​या संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
या संस्थांच्या माध्यमातून सर्व प्रकारचा ई- वेस्ट आणि इतर टाकाऊ प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. गोळा करण्यात आलेला एकत्रित मिश्रित कचरा परवानाधारक कंपनीला दिला जाणार आहे. पुढेही ई- वेस्ट ला प्रति किलो15 रु. हमी भाव दिला जाणार आहे. तर टाकाऊ प्लस्टिकला 5/- रु हमी भाव दिला जाणार आहे.
कचर्‍याच्या प्रतवारी प्रमाणेत्याला योग्य भाव देण्यात येईल, असे आवाहन ‘एन्व्हारर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’च्या वतीने करण्यात आले आहे. धायरी येथे ई- वेस्ट व टाकाऊ प्लास्टिक कचर्‍याचे संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, तसेच नवीन योजनांचा लाभ घ्यावा. यामुळे ई-वेस्ट आणि टाकाऊ प्लस्टिक कचर्‍याच्या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होईल, असे आवाहन करण्यात आले

कचरावेचकांनी भंगारवाले आणि इतर कचरा देणारे यांनी टाकाऊ प्लस्टिक व ई- वेस्ट हे ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’, धायरी

​’​पारी कंपनी​’​रोड, यश​’​प्लॅटिनम सोसायटी​’शेजारी, सिंहगड रोडयापत्त्यावर आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...