अखिल भारतीय कला गौरव सन्मान’ चे वितरण
पुणे:
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस् , डिझाईन अॅण्ड आर्टस् तर्फे आयोजित समारंभात ‘अखिल भारतीय कला गौरव सन्मान’ चे वितरण करण्यात आले. कला, अॅनिमेशन क्षेत्रातील ६ मान्यवरांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सन्मानार्थींमध्ये नीना सबनानी, सनथ पी.सी., फणी टेटली, सुरेश इरियत,रणजीत सिंग, पी.जयकुमार यांचा समावेश होता.
यावेळी प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य, सलीम सरफानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.