आत्मा कामात ओतल्याशिवाय समाजसेवा अशक्य : डॉ.के.एच. संचेती
नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
पुणे :’ नेत्रसेवेच्या क्षेत्रात पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान झोकून देऊन काम करीत आहे. तन, मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड समाजसेवा करता येणे शक्य नाही ‘, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.के.एच. संचेती यांनी केले.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचा यंदाचा ‘राष्ट्रीय नेत्रसेवा पुरस्कार ‘ अरविंद आय केअर सिस्टिम ‘ या संस्थेला अस्थितज्ज्ञ डॉ.के.एच. संचेती , तसेच ज्येष्ठ उद्योजक ‘ सकाळ पेपर्स लि. चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
मुक्तांगण हायस्कुल सभागृह, सहकारनगर येथे हा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता झाला.
डॉ संचेती म्हणाले, ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ही संस्था समाजसेवेच्या प्रेरणेने गेली 40 वर्ष अविरतपणे समाज कार्यात झोकून देऊन काम करत आहे .तन ,मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड समाजसेवा करता येणे शक्य नाही
डॉ .पी .नामपेरुमलयस्वामी हे गरिबांची सेवा करायच्या हेतूने आपले 50 टक्के काम, सर्जरी , उपचार इ मोफत करतात, असे अशक्य कोटीतील काम जगातील कोणताही डॉक्टर करत नसावा,तेंव्हा त्यांची या पुरस्कारासाठी योग्य निवड पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ‘ यांनी केली असेही डॉ संचेती म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले,’गरिबांवर मोफत उपचार करूनही उर्वरित लोकांच्या सेवेतून स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक पैसे कमवता येतात,हे डॉ नामपेरुमलयस्वामी यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते समाजसेवा करू. इच्छीणार्यांसाठी प्रेरणा आहेत.
डॉ. नामपेरुमलयस्वामी म्हणाले, ‘वाजवी पैसे घेऊनही दर्जेदार उपचार, रुग्णसेवा देता येते.आधुनिक तंत्रज्ञान वापरत असल्यानेच आम्ही अधिक रुग्णांपर्यंत पोचू शकतो.शहरी भागापेक्षा खेड्यात अधिक काम करण्याची गरज ओळखून आम्ही तेथे जनजागृती व वर्षभर नेत्रसेवा शिबीरे राबवत असतो.गरीब रुग्ण असो कि श्रीमंत आम्ही गुणवत्तेत अजिबात तडजोड करत नाही .
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उपचार करतो ,असे डॉ. नामपेरुमलयस्वामी यांनी सांगीतले.
आरती काबरा यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक डॉ.सतिश देसाई यांनी केले.स्वागत आणि सत्कारमूर्ती परिचय डॉ.मधुसुदन झंवर यांनी करून दिला.यावेळी डॉ. राजेश पवार, डॉ. पारस शहा, विनय शेट्टी, उल्हास पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ सुवर्णा गोलेचा यांनी आभार मानले.