दीर्घ काळातील मोठ्या लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर: परमिंदर धिल्लन
पुणे: ‘म्युच्युअल फंड आणि संपत्ती निर्मिती’ विषयावर २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.
‘म्युच्युअल फंड’ क्षेत्रातील तज्ञ परमिंदर धिल्लन यानी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
सुरेशचंद्र सुरतवाला असोसिएट्स आणि चंद्रकांत डोंगरे असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.२० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात अश्वमेध हॉल(एरंडवणे) येथे हे चर्चासत्र झाले. ‘म्युच्युअल फंड’ मधील गुंतवणुकीचे समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
परमिंदर धिल्लन म्हणाले, ‘स्वस्त कंपन्यांतील गुंतवणूक फायदा देते असा समज आहे, पण, महाग शेअर्स सुध्दा मोठे फायदे देतात. फंड मॅनेजरला या सर्व गोष्टींचे ज्ञान असावे लागते. सकल उत्पन्न कमी होत असताना, महागाई वाढते आहे. महागड्या एस यु व्हीं घेण्यासाठी वेटींग करावे लागते आहे.
शेअर्स मार्केट सर्वांना समजत नाही, पण म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक समजून घेता येण्यासारखी असते. मंदी कडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. गाडी, कपडे, मोबाईल, परकीय चलन विनिमय वाढत आहे. एच डी एफ सी सारख्या गृहबांधणी क्षेत्रातील कंपनीत परकीय गुंतवणूक वाढत आहे.
यावेळी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, साहित्यिक भारत सासणे यांच्यासह विविध क्षेत्रातील पुणेकर उपस्थित होते.
भारतात नकारात्मक घडामोडींची जास्त चर्चा होते. अवती भवती अधोगतीचे वातावरण आहे वाटत राहते. बचत आणि बँकेतील ठेविंचे व्याज दर कमी होत चालले आहे. आपल्याला महागाई कमी करता येणे शक्य नाही . भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्या इतके फायदे मिळणे शक्य नाही.मात्र, शेअर्स आणि मुच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. जोखीम घेवून देखील फायदेशीर गुंतवणूक करता येणे म्युच्युअल फंडाद्वारे शक्य आहे. दरमहा किमान 10 हजार गुंतवणूक म्युचुअल फंड मध्ये करण्याची सवय लावून घेतली तर भविष्यातील वाढीव खर्च, महागाई, घर, शिक्षण, पर्यटन,वैद्यकीय खर्चाची तोंडमिळवणी करता येणे शक्य आहे. सिस्टेमेटीक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करणे हे योग्य माध्यम ठरू शकते. इक्विटी मधील गुंतवणूक पब्लिक प्रोव्हीडंड फंड पेक्षा अधिक लाभ देऊन जाते. फंड निवडताना पोर्टफोलिओतील वैविध्य जपले पाहिजे. एक दिवसापासून मुदतीची गुंतवणूक फंडात करू शकतो, पण,पाच वर्षापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
शेअर बाजार कोसळला, तरी तो पुन्हा करेक्शन द्वारे उभारी घेत असतो. त्यामुळे घाबरून जाता कामा नये.
लाखाहून अधिक गुंतवणूक फंडात करणाऱ्यांना मुदतीचे विथड्रॉवल प्लॅन पण उपलब्ध असतात . एकूण मुदतीच्या आधी गरजेपोटी काही रक्कम काढत राहिले, तरी प्रत्यक्ष फायद्यातून उरणारी रक्कम नक्कीच घसघशीत असते,असे मत त्यांनी मांडले.
30 वर्षात आपण केलेल्या गुंतवणुकीच्या 4 ते 40 पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत असते. गुंतवणुकीस प्रारंभ करायला उशीर झालाय असे कधीही न समजता, सुरुवात करावी,असेही धिल्लान यांनी सांगितले.