खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग
पुणे, दि. ८ जुलै : खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.12 वाजता 808 क्युसेस चा विसर्ग सुरू करण्यात आला.यासाठी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले.
खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (८ जुलै) रात्री १.०० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीत ८०८ क्युसेकने विसर्ग वाढवून एकूण १,६८४ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार हा विसर्ग पुढील काळात कमी किंवा अधिक केला जाऊ शकतो, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रात असलेली जनावरे, साहित्य किंवा इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ही माहिती दिली.

