सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार
पुणे :खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चोखंदळ पुण्यात सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ या शासकीय संस्थेमध्ये शुक्रवारी करण्यात आला .
‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ‘ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता . पूना गेस्ट हाऊस ‘चे किशोर सरपोतदार ,’दोराबजीज ‘ ,गणेश भेळ यांच्यासह १५ व्यावसायिकांचा सत्कार ज्येष्ठ हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञ राजन केळशीकर यांच्या हस्ते करण्यात आला . इन्स्टिट्यूट च्या प्राचार्य आणि सुवर्णमहोत्सव उपक्रमाच्या प्रमुख संयोजक डॉ. अनिता मुदलियार यांनी स्वागत केले .
इन्स्टिट्यूट संचालक मंडळाचे सदस्य नाना नलावडे, समीर गाजरे, प्राध्यापक पुसेगावकर, प्रा. सचिन उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या माजी प्राचार्य श्रीमती गंबुळी यांच्या योगदानाचा सर्वांनी भरभरून उल्लेख केला. माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने दगडू मामा यांनी ह्रद्य मनोगत व्यक्त केले.
आजी -माजी विद्यार्थ्यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त फूड फेस्टिव्हल आयोजित केला . त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातून मॉडेल कॉलनीत आलेल्या या इन्स्टिट्यूटच्या दैदीप्यमान प्रवासाचा सर्व वक्त्यांनी उल्लेख केला.सर्व आयोजन आजी -माजी विद्यार्थ्यांनी केले.