पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दहा हजार विद्यार्थ्याचा सहभाग असलेल्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर करण्यात आले होते .
सोमवार, दि. 19 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार आणि डॉ एन वाय काझी यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला . मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले . लाल महाल येथे पुष्पहार अर्पण करून सांगता झाली
पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील दहा हजार विद्यार्थी,शिक्षक ,प्राद्यापक ,सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक होती . मिरवणुकीचे हे 18 वे वर्ष होते .
आझम कॅम्पस ,पूना कॉलेज, क्वार्टर गेट, सोन्या मारुती चौक, मार्गे निघालेल्या या मिरवणुकीची लाल महाल येथे सांगता झाली . मिरवणूकीत शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे लेझीम पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले .
‘शिवजयंती उत्सव सुरु करणारे महात्मा फुले ’ हा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला .कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी प्रा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तो सादर केला . दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.