इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा)च्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आझम कॅम्पस येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला . माजी विद्यार्थ्यांच्या ‘द नेस्ट ‘ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन. जगताप , लतिफ मगदूम (सहसचिव , एम सी ई सोसायटी) ,इरफान शेख (सहसचिव , एम सी ई सोसायटी) उपस्थित होते .
सलमान राखांगी यांना ” प्राईड ऑफ अल्युमनी ‘ अक्षय रोकडे यांना ‘बेस्ट आंत्रप्रुनर‘ या पुरस्काराने गौरविण्यात आले .
कीर्ती सपारे यांनी सूत्र संचालन केले . अरिफ खान पठाण यांनी आभार मानले .