फ्रान्स मित्र मंडळ’च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांची निवड
पुणे :पुणे आणि महाराष्ट्राला फ्रान्स देश ,तेथील जीवन ,संस्कृतीशी जोडणाऱ्या ‘फ्रान्स मित्र मंडळ ‘ या पुण्यातील ख्यातनाम संस्थेच्या अध्यक्षपदावर पुण्यभूषण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांची निवड झाली.
पुण्यात झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
2019 ते 2021 या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात आले आहेत . डॉ सतीश देसाई(अध्यक्ष ),निर्मला पुरंदरे (मानद अध्यक्ष) ,डॉ उल्हास जोशी (उपाध्यक्ष),भारती भिडे(प्रमुख कार्यवाह),माणिक कोतवाल(सहकार्यवाह),डॉ दीपक मांडे(खजिनदार)डॉ वीणा दीक्षित(सदस्य),मेघना साठे(सदस्य) यांची निवड करण्यात आली आहे .
निर्मलाताई पुरंदरे यांनी दीर्घ अनुभवातून मार्गदर्शन करावे, या साठी कार्यकारिणीने त्यांना तहहयात मानद अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली.
फ्रान्स मित्र मंडळाचा नुकताच पुण्यात सुवर्णमहोत्सव पार पडला. त्यात डॉ. देसाई यांच्या गतिमान संयोजनाचा मोठा वाटा होता.
श्री. अच्युतराव आपटे व फादर द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे , शंतनूराव किर्लोस्कर, प्रतापराव पवार यांच्या योगदानाने झाली.
मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केन्द्रांवरून साधारण पंचवीस व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते. तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो. आतापर्यत ६o० मराठी बांधव फ्रान्सला या माध्यमातून भेट देऊन आले आहेत, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
सांस्कृतिक देवाण घेवाण ह्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. ह्या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालिरिती समजून घेतात. एकंदरीने परस्पर स्नेहव्रृद्धी साधली जाते.