मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्य वाचन स्पर्धेला चांगला प्रतिसाद
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिक्षक ,प्राध्यापक कवींची काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . हा कार्यक्रम आझम कॅम्पस असेम्ब्ली हॉल येथे १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता .
११० कवींनी सहभाग घेतला . प्रसिद्ध कवींच्या मराठी कविता ,स्व रचित कविता ,विडंबन गीते सादर करण्यात आली . बशीर मुजावर ,सुहासिनी शिरढोणकर यांनी परीक्षण केले . मुमताज पीरभॉय यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . मराठी अकादमीच्या नूरजहाँ शेख यांनी संयोजन केले . मुख्याध्यापक आयेशा शेख उपस्थित होत्या .
मराठी संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी ए इनामदार यांनी केले . समारोप १५ जानेवारी रोजी दिनकर टेमकर ( प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक),दत्तात्रय जगताप (शिक्षण संचालक ,परीक्षा परिषद ),दिनकर पाटील (शिक्षण संचालक ,अल्पसंख्यांक ,प्रौढ शिक्षण ),डॉ . गणपत मोरे (प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी ),हारून अत्तार ( शिक्षणाधिकारी ) उपस्थित राहणार आहेत . हा समारोप १५ जानेवारी सायंकाळी साडे पाच वाजता आझम कॅम्पस येथे होणार आहे .या वेळी कवी प्रदीप निफाडकर यांचा ‘गझलवारी ‘ हा कार्यक्रम होणार आहे .
या पंधरवड्यात मराठी खाद्य प्रदर्शन ,वक्तृत्व स्पर्धा ,काव्य वाचन असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते .