भारुड कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या भारुड कार्यक्रमाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
माणसांनी नसत्या भानगडी करू नये ,व्यसनं करू नये म्हणून संतांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडं लिहिली असे सांगत निरंजन भाकरे यांनी आत्ताच्या पिढ्यांमधे
समाजात ज्या अनिष्ठ चाली रूढी व्यसनं सवयी आहे त त्यावर बोट ठेवत , आधुनिक दाखले देत वासुदेव, बुरगुंडा,बहुरुपी व नंदी हे काही भारूड प्रकार सादर केले. आज शास्त्रीय प्रथा मागे पडल्यात , अशा अनेक बदलल्या आहेत. सामाजिक चाली,परंपरांवर भाकरे यांनी आपल्या भारूडातून नर्म विनोदाद्वारे बोट ठेऊन आधुनिक भारुड सादर केले. भाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले.
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६६ वा कार्यक्रम होता . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला होता.