पुण्याला सिलेंडर मुक्त करण्याचा ‘एमएनजीएल ‘ चा निर्धार

Date:

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ‘ चे संचालक राजेश पांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती 
नैसर्गिक गॅस ची माहिती देणाऱ्या विशेषांकाचे गिरीश बापट ,अनिल शिरोळे यांच्या हस्ते प्रकाशन 
पुणे :
‘पुण्याला सिलेंडर मुक्त करण्याचा ‘ एमएनजीएल ‘ चा निर्धार असून भारतात २०२० पर्यंत २ कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न  आहे ‘ अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल ) चे संचालक राजेश पांडे यांनी  सोमवारी सायंकाळी हॉटेल प्राईड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट ,खासदार अनिल शिरोळे , पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन ,एमएनजीएल ‘चे संचालक संतोष सोनटक्के उपस्थित होते .
नैसर्गिक गॅस ची माहिती देणाऱ्या विशेषांकाचे गिरीश बापट ,अनिल शिरोळे ,राजेश पांडे,संतोष सोनटक्के,सुहास पटवर्धन ,यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
राजेश पांडे म्हणाले ,’पुण्यात घरोघरी पाईप द्वारे गॅस देण्याचे नियोजन केले जात असून प्रशासकीय अडचणी न आल्यास पुणे शहराला दीड वर्षात ‘सिलेंडर मुक्त ‘ करू . २०२० पर्यंत २ कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न  आहे. देशात २२ नोव्हेंबर पासून १०० जिल्ह्यात काम सुरु होत आहे .
त्यातील ४ जिल्हे एमएनजीएल कडे देण्यात आले आहेत . हा गॅस नैसर्गिक ,सुरक्षित ,स्वच्छ ,स्वस्त असून सहज उपलब्ध आहे .
फक्त ५०० रुपये भरून  हा गॅस सोसायट्यातील  घरांना मिळू शकतो . ५ हजार डिपॉझिट टप्प्याटप्प्याने मासिक २५० प्रमाणे भरून उपलब्ध होऊ शकतो . उर्वरित बिल गॅस प्रत्येकाच्या वापराप्रमाणे येईल . पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी या गॅस चा उपयोग घरे ,उद्योग आणि वाहनांना करता येणार आहे .
सोसायट्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून नैसर्गिक गॅस आणि एमएनजीएल च्या योजनांची माहिती असणारा विशेषांक १६ हजार गृहनिर्माण संस्थांपर्यंत दिवाळीत पोहोचविला जाणार आहे ,त्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाची मदत घेण्यात आली आहे ,असेही पांडे यांनी सांगितले
गिरीश बापट म्हणाले ,’पालिका पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी ,लोक प्रतिनिधी आणि एमएनजीएल चे संचालक यांची बैठक घेण्यात येईल . त्यानंतर पाठपुराव्याची व्यवस्था एमएनजीएल ने तयार करावी . आता दीड लाख घरात पोहोचलेला नैसर्गिक गॅस वर्षभरात अडीच लाख घरात गेला पाहिजे .
खासदार अनिल शिरोळे म्हणाले ,’शहरात एमएनजीएल पाइपसाठी खोदाईसाठी महापालिका परवान्याचेकाम पूर्ण झाले असून ,सर्व कनेक्शन लवकरात लवकर देणे आता शक्य आहे
संतोष सोनटक्के म्हणाले ,’ नैसर्गिक गॅस हा वीज ,पेट्रोल ,सीएनजी ला पर्याय असून घरगुती वापर ,औद्योगिक वापर आणि वाहनांसाठी तो वापरता येणार आहे . ८ लाख घरांपर्यंत पोचणे शक्य आहे .
भाड्याने घर दिलेल्या मालकांकडून गॅस पाईप जोडण्यात आळस केला जातो म्हणून त्यांना प्रति महिना ५० रुपये भरून गॅस भाडेकरूंना जोडून देता येईल . वापरानुसार बिल भाडेकरूंना भरता येईल . सोसायट्यांना सामूहिक नोंदणीत ७० टक्के सवलत दिली जाईल ,असे एमएनजीएल अधिकारी मिलिंद रणशेट्टीवार यांनी सांगितले .
सुहास पटवर्धन म्हणाले ,’ सर्वांच्या हिताच्या या योजनेत एमएनजीएल ला पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ जन जागृतीत सर्व सहकार्य करेल . ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.