पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ तर्फे सलग ९ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाबाबत डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थेचे सचिव अन्वर राजन आणि ‘युवक क्रांती दल’ चे सचिव संंदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष मयुरी शिंदे, नितीन शास्त्री यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दिनांक १ ते ८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये होणारा हा सप्ताह ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी‘, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.
गांधी सप्ताहाचे उदघाटन श्रीनिवास पाटील (माजी प्रांतपाल, सिक्कीम राज्य ), यांच्या हस्ते सोमवारी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘युवक क्रांती दल’ यांनी केले आहे.
याप्रसंगी सौरभ राव (आयुक्त, पुणे म.न.पा.), डॉ.पी.ए.इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) असतील.
सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला ७१ वर्षांनंतरही सांगणे अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती (दिनांक २ ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी‘तर्फे ‘शांती मार्च‘चे आयोजन करण्यात येते. हा ‘शांती मार्च‘ सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘शांती मार्च‘ चा मार्ग अलका चौक, सेनापती बापट पुतळा ते लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मंडई येथे समारोप सभा होईल.’
गांधी सप्ताह उद्घाटनाआधी महात्मा गांधींच्या जीवनकार्यावरील फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हे उद्घाटन अभय छाजेड (विश्वस्त, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) यांच्या हस्ते ‘कला दालन’, बालगंधर्व रंगमंदीर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे संयोजक नितीन शास्त्री आहेत.
खादी व विविध उपयोगीचे स्टॉल सप्ताहादरम्यान गांधी भवन आवारात उपलब्ध असतील.
मंगळवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता गांधी भवन येथे शुभांगी मुळे व सहकलाकार यांचे प्रार्थना व भजन, प्रसाद भोजन सकाळी ११ ते दु. ३ पर्यंत. ‘गांधी’ फिल्म शो सादरीकरण दुपारी ३ वाजता.
बुधवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता ‘लाईफ इज ब्युटीफुल’ (1997) हा ऑस्कर विजेता चित्रपट दाखवला जाईल. सायंकाळी 6 वाजता ‘शेतकर्यांसाठी अच्छे दिन कधी ?’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. पाशा पटेल (अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग), अजित नवले (सचिव, शेतकरी सुकाणू समिती), रविकांत तुपकर (नेते, स्वामिमानी शेतकरी संघटना), आ.बच्चू कडू (प्रहार संघटना) सहभागी होतील.
गुरूवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ‘बेन-हर’ (२०१६) या १९५९ च्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक दाखवण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ विषयावर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (विवेकानंदांचे अभ्यासक) यांची मुलाखत व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता माहितीपट ः ‘अजात’ (जाती अंताचा पुरस्कार करणार्या अजात पथावरील माहितीपट). ‘अघोषित आणीबाणी चे आव्हान’ विषयावर पत्रकार निखिल वागळे यांच्याशी मुक्त संवाद व व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता मुक्त संवाद, सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल.
शनिवार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता ‘ मॉडर्न टाईम्स ‘ (चार्ली चाप्लीनचा गाजलेला चित्रपट) दाखवला जाईल. ‘गांधी की खोज’विषयावर मुक्त संवाद व व्याख्यान प्रा.अपूर्वानंद झा (प्राध्यापक, दिल्ली विश्वविद्यापीठ) यांच्याशी सकाळी ११ वाजता मुक्त संवाद, सायंकाळी ६ वाजता त्यांचे व्याख्यान होईल.
रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माहितीपट ः मा. ना. (माधव कुलकर्णी या गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकावरील माहितीपट) दाखवला जाईल. प्रसिद्ध जादूगार संजय रघूवीर ‘जादूचे प्रयोग’ दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ६ वाजता पवन नाईक आणि सहकलाकार यांचे ‘सुफी दरबार’ गाण्याचा कार्यक्रम होईल.