पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ चे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार 2018’ (व्होकेशनल एक्सलेन्स अॅवॉर्ड ) अपूर्वा पालकर (शैक्षणिक क्षेत्र), शामला वनारसे (मानसशास्त्रज्ञ )मीरा बडवे ( दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी सामाजिक काम) यांना जाहीर झाले आहेत.
रविवार, दिनांक 18 मार्च, रोजी सायंकाळी 7.30 वाजता गांधीभवन हॉल, कोथरूड येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर (दक्षिण विभाग) यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली.
2019-20 मधील प्रांतपाल रवी धोत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मनीष धोत्रे (सचिव,‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’), विदुला भट (निमंत्रक ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’) यावेळी उपस्थित राहतील.