वडगाव -धायरी प्रभाग (३३) अंतर्गत “माझा प्रभाग – माझी जबाबदारी” नागरिकांची पर्यावरण समिती स्थापन
कचरा व्यवस्थापन कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
पुणे :
पुणे शहरात वडगाव -धायरी प्रभाग क्र. (३३) अंतर्गत ‘माझा प्रभाग-माझी जबाबदारी’ नागरिकांची पर्यावरण समिती स्थापन करण्यात आली. या समिती अंतर्गत ‘कचरा व्यवस्थापन कार्यशाळा’ संपन्न झाली. सदर कार्यक्रम शनिवारी ‘मुक्ताई गार्डन’, धायरी येथे पार पडण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घन कचरा व्यवस्थापन सह-आयुक्त सुरेश जगताप आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ चे कायदेशीर सल्लागार दत्तात्रय देवाळे उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरीदास चरवड, राजश्री नवले, नीता दांगट, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय चे उपायुक्त उमेश माळी, ‘वनराई’ चे रविंद्र धारिया, मुकुंद शिंदे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे शेखर मुंदडा, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’चेविलास पोकळे, ललित राठी, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, ‘व्यापारी असोसिएशन’चे सचिन निवंगुणे, ‘सागर मित्र’ चे विनोद बोधनकर, ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’ चे विजय वरुडकर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक संस्था, कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयातील तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन विषयी जनजागृती अभियान व प्रत्यक्ष कृती- उपाययोजना राबवण्यात आली. या उपक्रमात प्राथमिक प्रशिक्षण, घन कचरा व्यवस्थापन प्रदर्शन व चर्चा हेतू, प्रभागातील नागरिक, सोसायटी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून धायरी-वडगाव प्रभाग क्र. 33 परिसरातील सर्व प्रकारच्या कचर्याचे व्यवस्थापन व्हावे व पर्यावरण संतुलन कार्यासाठी प्रशासन यंत्रणेबरोबर नागरिकांचा सहभाग वाढवा हा हेतू ठेऊन ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’ तर्फे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वरुडकर यांनी केले. आभारप्रदर्शन ललित राठी यांनी केले. आशीष पोलकडे यांनी ओला कचर्याबद्दल व सुका कचर्याबद्दल ‘एन्व्हार्यमेंटल क्लब ऑफ इंडिया’चे नीलेश इनामदार यांनी मार्गदर्शन लाभले.
प्रदर्शनामध्ये घन कचर्यात काम करणार्या संस्था आणि इतर सामाजिक संस्था चे योगदान होते. यामध्ये ‘जनवाणी’, ‘स्वरूप इंडस्ट्रीज’, ‘ऑपेल प्रो’, ‘प्याटपर्ट’, ‘ग्रीन इफेक्ट’, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’ या संस्थांचा समावेश होता.
‘जनवाणी’तर्फे ओला आणि सुक्या कचर्याच्या वर्गीकरणाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच ‘स्वरूप इंडस्ट्रीज’ तर्फे उद्योजक बर्वे आणि घळसाई यांनी घरगुती कंपोस्ट चे मॉडेल, ‘ऑपेल प्रो’ तर्फे होम कंपोस्ट, ‘प्याटपर्ट’ तर्फे टाकाऊ प्लॅस्टिक कचर्यापासून निर्माण होणारे ऑइल, ‘ग्रीन इफेक्ट’ तर्फे घरातल्या सुक्या कचर्यापासून पुनर्वापर करण्यात आलेल्या वस्तू, ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’तर्फे संकलन केलेल्या कचर्याचे रिसायकलिंग याबद्दल माहिती सादर करण्यात आले होते.
‘माझा प्रभाग-माझी जबाबदारी’ नागरिकांची पर्यावरण संयोजक समितीमध्ये ‘एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘सोशल रिस्पोन्सिबिलिटी’, ‘केदारनाथ सामाजिक संस्था’, ‘विशाल सिंहगड विद्या व क्रीडा प्रतिष्ठान’, ‘कै. चंद्रकांत दांगट पाटील ट्रस्ट’ व ‘मुक्ताई प्रतिष्ठान’ यांचा समावेश होता.