मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते गिरीश महाजन,पवारांच्या त्रासाला कंटाळून कॉंग्रेस मधून भाजपात आलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या चौघांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे. पाटील, महाजन, मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या आतील वर्तुळातील नेते मानले जातात. त्यामुळे या तिघांना मंत्रिपद मिळणं साहजिकच होतं. याशिवाय, आशिष शेलार यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची तूर्तास मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. तर विधानपरिषदेवरील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेसुद्धा पहिल्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता कमी मानली जाते. . पहिल्या टप्प्यात एकूण १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून नऊ, तर भाजपकडून नऊ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याची माहिती आहे. मंत्रिपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी काही संभाव्य नावं समोर येत आहेत. भाजपकडून चौघा दिग्गजांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे.