मुंबई-मला उद्या सल्लागार समितीच्या बैठकीबाबत कळवण्यात आलं.उद्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत समजलं नाही.उद्याची बैठक अधिवेशनाबाबत आहे.. उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
“विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच विविध चॅनलच्या माध्यमातून मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष नेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, अशी माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.
“गेल्या बऱ्याच दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. तो लवकर होईन, असचं सांगण्यात येत होत. मात्र, नुकताच त्यांना दिल्ली दौरा झाला आहे आणि आजही त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे.”, असेही ते म्हणाले.