कर्मचारी, अधिकारी यांच्या कल्पकता व मेहनतीचे फळ
पुणे-कोथरूड डेपो कडील सीएनजी बस क्र. ८६८ दि. २२/०२/२०२१ रोजी मार्गावर असताना अपघातामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संपूर्णपणे जळाली होती. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले होते. कोथरूड डेपो वर्कशॉप व सेंट्रल वर्कशॉप मध्ये या अपघातग्रस्त बसचे काम पूर्ण करून सदरची बस संचलनात आणणेसाठी कर्मचारी व अधिकारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
तत्कालीन कोथरूड डेपो मॅनेजर चंद्रशेखर कदम, सध्याचे डेपो मॅनेजर यशवंत हिंगे व डेपो मेन्टेनन्स
इंजिनिअर विलास मते यांचे मार्गदर्शनाखाली कोथरूड डेपो वर्कशॉप व सेन्ट्रल वर्कशॉप कडील कर्मचाऱ्यांनी कल्पकता व मेहनतीने वायरींग व इंजिनचे काम केले. तसेच बसच्या बॉडीचे काम, बसचे दरवाजे व बसच्या आतील काम करण्यासाठी स्क्रॅप बसेसचे मटेरीयल वापरून कर्मचाऱ्यांनी जळीतग्रस्त बसचे रूपडे पालटले. सदर बसचे आरटीओ पासिंगचे कामकाज दिनांक १९/११/२०२२ रोजी पूर्ण करून बस संचलनकामी उपलब्ध झाली आहे.
राजेश रूपनवर, मनोहर पिसाळ, रमेश चव्हाण, राजेश कुदळे आदी अधिकाऱ्यांनी सदर बससाठी
आवश्यक स्पेअरपार्ट व युनिट उपलब्ध करून दिले. वर्कशॉप कडील कर्मचारी सुनिल वाडकर, निखील बागुल, राजेंद्र पायगुडे, सुनिल मारणे, अजय मारणे, सागर जाधव,अरविंद दुपटे, इंद्रजित मोहिरे, नवनाथ
राठोड, राजू गाडे,अश्विन बळगे, देविदास बोगाणे, प्रदिप टिळेकर, डी. जी. महाजन, शेंडगे,
लादे व इतर कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त बस पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांनी अपघातग्रस्त बसचे काम करून बस संचलनात आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले.