Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कॉंग्रेस मधील एका सामान्य कार्यकर्त्याला लागली स्वीकृत नगरसेवकपदाची लॉटरी

Date:

पुणे-गणेश बिडकर ,सुभाष जगताप अशा मातब्बर ,मुरब्बी राजकारण्यांना आपापल्या पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत पाठविले असताना , बॅरिस्टर गाडगीळ ,प्रकाश ढेरे यांच्या तालमीत तयार झालेला ,माजी नगरसेवक असला तरीही  सामान्य कार्यकर्ता म्हणून जीवन जगणारा ..  पुण्यातील शहर काँग्रेसचे  उपाध्यक्ष  अजित दरेकर यांच्यासाठी चिठ्ठी ‘लकी’ ठरली आहे. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी दरेकर यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली आहे. शिवसेनेकडून योगेश मोकाटे यांना तर काँग्रेसकडून अजित दरेकर यांना उमेदवारी दिली होती. दोघांपैकी एकाची आज चिठ्ठीद्वारे निवड केली जाणार होती. निवडणुकीसाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्यात दरेकर यांना स्वीकृत सदस्यपदाची ‘लॉटरी’ लागली. येत्या २४ तारखेला त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत संख्याबळ लक्षात घेता भाजप ३, राष्ट्रवादी १ आणि शिवसेना-काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची आज चिठ्ठीद्वारे निवड केली जाणार होती. स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसकडून अजित दरेकर आणि शिवसेनेकडून योगेश मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. दोघांपैकी कुणाला लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आज सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्तांच्या दालनात निवडणूक घेण्यात आली. यावेळी राजेंद्र जगताप, नगरसचिव सुनील पारखी आणि उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे अजित दरेकर विजयी झाले.
भाजपकडून गणेश बिडकर, रघुनाथ गौडा आणि गोपाळ चिंतल यांनी कालच अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी अर्ज भरला आहे. चाकणकर यांना अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यामुळे सुभाष जगताप यांची निवड निश्चित झाली आहे. तर आज अजित दरेकर यांची निवड झाली आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

265 मृतदेह रुग्णालयात आणले:DNA सॅम्पलिंग सुरू; PM मोदींचा घटनास्थळी दौरा

अहमदाबाद:एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये...

दोन्ही इंजिन बंद पडल्याने अपघात..मृत्यूच्या थरारक प्रवासाचा भारतासोबत अमेरिकाही करणार तपास..

६२५ फुटांवरून ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने… अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या...

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...