पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 6 मार्चला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन मार्च आहे. पालिकेतील पदाधिकारी निवडताना नेत्यांनी आता तरी आगामी निवडणुकीत पक्षाला ताकद देतील अशा प्रवृत्तिच्या नगरसेवकांचा विचार करावा असा मत प्रवाह असणाऱ्या भाजपा मधील नगरसेवकात या निवडणुकीच्या अनुषंगाने अस्वस्थता पसरली आहे.
‘पीएमपीएल’च्या नयना गुंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष निश्चित मानला जात आहे. अध्यक्षपदासाठी पुन्हा हेमंत रासने यांनाच संधी देणार असा दावा होत असताना कसब्या व्यतिरिक्त अन्य विधानसभा मतदार संघातील मातब्बर असलेल्या सदस्याची ताकद वाढविली पाहिजे असा मतप्रवाह देखील आहे , त्याच त्याच भागावर मेहेर नजर न ठेवता नेत्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवीणाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या , नागरी हिताच्या कामास प्राधान्य देणाऱ्याला येणाऱ्याना संधी द्यावी असा मतप्रवाह आहे मात्र नेत्यांच्या भूमिकेबद्दल च साशंकता असलेल्या नगरसेवकात अस्वस्थता वाढते आहे