उरळीदेवाची आणि फुरसुंगी चा कचरा डेपो बंद करण्यासाठी कृती आराखडा तयार ….

Date:

पुणे- मागील महिन्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुणे शहरातील कचरा तेथील डेपोमध्ये टाकण्यास विरोध दर्शवला होता. पालिका प्रशासन आणि महापौर यांच्या ग्रामस्थांसोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला एक महिन्याच्या आत राज्य सरकारला कचरा प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी आराखडा सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, प्रशासनाने मागील आठवड्यात महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे आराखडा सादर केला. त्यानंतर आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार सुप्रिया सुळे,  खासदार संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,आमदार मेधा कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी उरुळीदेवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार कचरा प्रश्नावर कृती आराखडा  तयार करण्यात आला आहे. त्यावर आता नागरिक आणि लोकप्रतिनिधी ,सामाजिक संस्था यांच्या सूचना मागविण्यात येणार आहेत . उरळी आणि फुरसुंगीचा कचरा डेपो टप्प्या टप्प्याने बंद करण्यासाठी हा कृती आराखडा प्रभावीपणे काम करेल आणि शहरातील विविध  जागा संपादन करून तिथे कचरा  प्रकल्प राबविण्यात येतील . रोज घरोघरी कचरा गोळा करणे, कचरा वेचकांना मासिक वेतन देणे ,सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारणे, पुणे शहरात सद्यस्थितीत जे प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाची क्षमता वाढविणे आणि शहरातील पंन्नास, शंभर आणि दोनशे टण कचरा जिरवण्याची क्षमता असलेले इतर प्रकल्प कार्यान्वित करणे, अशा अनेक बाबींचा यात समावेश असून ७२ पानांचा हा कृती आराखडा

http://www.punecorporation.org/sites/default/files/swm_appeal_marathi.pdf

किंवा

http://www.punecorporation.org/mr/appeal-citizens-media

या लिंकवर क्लिक केल्यास महापालिकेच्या थेट वेबसाईटवर लोड केलेल्या कृती आराखड्याची ७२ पाने नागरिक पाहू शकतील . त्यातील हि पहा काही पाने इथे ….

या १० कलमी कार्यक्रमात म्हटले आहे प्रत्येक कुटुंबाने कचरा वेचकांना मासिक शुल्क द्यावे ….
कोणकोणत्या गोष्टीसाठी दंड आहे ते पहा इथे …

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...