बोगस कामगारांनंतर कंत्राटी ‘चौकीदार’भरतीतही असंख्य गैरप्रकार ..कारभार पुणे महापालिकेचा

Date:

पुणे : महापालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये बिनधास्त प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने बोगस कर्मचाऱ्यांचा वावर  असताना कान्तार्ती पद्धतीने सुरक्षा रक्षक नियुक्तीत देखील पालिका प्रशासन सरकारी फसवणूक करत आहे. अशा भरतीसंबधी असलेले सर्व नियम ठेकेदार कंपन्यांसाठी टाळले जात आहेत. केवळ एका शब्दाचा फेरफार करून ही चलाखी करण्यात आली असून त्यावर गेली अनेक वर्षे गरीब सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.अरुण भाटिया सारख्या एखाद्या निवृत्त सनदी अधिकाऱ्या कडून किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याधीशाकडून चौकशी केली तर  हि महापालिका रोजगारासाठी झटत असणाऱ्या गरीब तरुणांची सर्वाधिक आर्थिक आणि शाररीक आणि मानसिक छळणूक करणारी महापालिका ठरेल यात शंका नाही .

राज्य सरकारने अध्यादेश जारी करून कोणत्याही सरकारी आस्थापनेसाठीचे सुरक्षा रक्षक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडूनच घेण्याचे बंधन घातले आहे. त्यात महापालिकांचाही समावेश आहे. पुण्यात असे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आहे. त्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त असलेले सरकारी अधिकारी मुख्य कामगार अधिकारीही आहेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेले सुरक्षाकही आहेत. ते अन्य सरकारी आस्थापनांकडून घेतलेही जातात. महापालिका प्रशासनाने मात्र त्यातून सोयीस्कर सूटका करून घेतली आहे.

त्यासाठी सुरक्षा रक्षक याऐवजी सुरक्षा रक्षक मदतनीस असा बदल करण्याची चतुराई प्रशासनाने केली आहे. असे तब्बल एक हजार तीनशे सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत. त्यात अनेक माननियांचे कार्यकर्ते आहेत. ते माननियांच्या कार्यालयाची सुरक्षा करत असतात. कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या विशिष्ट कंपन्यांकडून प्रशासन हे सुरक्षा रक्षत घेत असते. त्यासाठी निविदा वगैरे सगळी प्रक्रिया कागदोपत्री केली जाते, मात्र तरीही वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन करणाऱ्या विशिष्ट ठेकेदारांनाच हा सुरक्षा रक्षक मदतनीस पुरवण्याचा ठेका मिळतो. प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार कंपनी यांच्या संगनमताने होत असलेल्या या प्रकारात गरीब सुरक्षा रक्षकांची मात्र आर्थिक पिळवणूक होते आहे.
नियमानुसार कंत्राटी कामगारांसाठीही सरकारने अनेक कायदे केले आहेत. त्यांनाही किमान वेतन कायदा लागू आहे. त्यांचा भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने जमा करणे बंधनकारक आहे. त्यातही विशिष्ट काम करणाºया कामगारांना त्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य ठेकेदाराने पुरवणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही गोष्ट ठेकेदार कंपनीकडून केली जात नाही. प्रशासनही त्यांना तसे करायला भाग पाडत नाही. त्यामुळे गणवेश, काठी, शिट्टी, टोपी असे सगळे साहित्य कामगाराला स्वत:च्या पैशाने खरेदी करावे लागते. ठेकेदार देईल त्या वेतनावर काम करावे लागते. भविष्य निर्वाह निधी वगैरे कोणताही सुविधा त्याला मिळत नाही.
महापालिका कामगार युनियनच्या वतीने याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनाही आम्ही सुरक्षा रक्षक नाही तर सुरक्षा रक्षक मदतनीस भरती करतो असेच सांगण्यात आले. काम सगळे सुरक्षा रक्षकांचे करत असताना मदतनीस म्हणजे काय हे या १ हजार ३०० सुरक्षा रक्षकांना माहितीही नाही. युनियनने कंत्राटी कामगारांवरील अन्यायाची तड लागावी यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. त्यांच्या वतीने एकदा या आर्थिक अन्यायाच्या विरोधात शिट्टी मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी यात लक्ष घालू असे आश्वासन देत युनियनची बोळवण करण्यात आली. त्यानंतरही युनियन याबाबत पत्र देत, आयुक्तांची भेट घेत तड लावण्याचा प्रयत्न करत आहे.

कामगार कायदे धाब्यावर ..
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळासह ,कामगार आयुक्त यांनी महापालिकेच्या या कारभाराबाबत चक्क डोळेझाक चालवून  एक प्रकारे या  प्रकरणी त्यांनी हि जणू सहभाग दर्शविन्याचा कारभार सुरु ठेवला असावा असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोगस व्होटिंग: हडपसरमध्ये दोन हजार लोक पकडल्याची केंद्रीय मंत्र्यांची माहिती

पुणे – पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभारी बदलण्याचा स्पष्ट संदेश...

डी.वाय.आकुर्डी, एटीएसएस, व्हीआयटी पुणेचे दमदार विजय

एमआयटी–एडीटी विद्यापीठातील क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादलोणी काळभोर :एमआयटी...

निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही:मार्कर 2011 चा , तर ‘पाडू’चा 2004 पासून वापर; आयुक्त दिनेश वाघमारेंचा दावा

मुंबई-महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात...