पुणे-उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना थंडगार पाणी मिळाल्याचा
आनंद अवर्णनीय असतो.हाच आनंद पक्ष्यांना मिळावा व रणरणत्या उन्हात फिरताना त्यांना
थंडगार पाणी मिळावे यासाठी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल
यांच्या पुढाकाराने मातीची ५००० भांडी तयार करून पक्षी प्रेमी नागरिकांना ती मोफत
देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.यासाठी विशिष्ट प्रकारची मातीची पसरट भांडी
मुद्दाम तयार करून घेण्यात आली असून गेली ५ वर्षे त्यांचा हा उपक्रम चालू आहे.नागरिकांचा
देखील यास मोठा प्रतिसाद लाभत आहे.याबद्दल समाधान वाटत असून आत्तापर्यंत २५०० हून
अधिक मातीची भांडी नागरिकांना देण्यात आली आहेत.ज्या पक्षीप्रेमी नागरिकांना अशी
मातीची भांडी हवी असतील त्यांनी अमित बागुल ९८२२२३२३२२या क्रमांकावर संपर्क
साधावा असे आवाहन अमित बागुल यांनी केले आहे.
पक्ष्यांसाठी ५००० मातीची भांडी उन्हाळ्यातील अनुकरणीय उपक्रम
Date: