Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पार्किंग पॉलीसिवर उगारली ‘हेडमास्तरांनी छडी ‘(व्हिडीओ)

Date:

पुणे-घराघरातील नागरिकांना पार्किंग शुल्काद्वारे  जिझिया कराचा दणका देऊ पाहणाऱ्या आयुक्तांच्या ‘ पॉलीसी’वर भाजपच्या हेडमास्तरांनी छडी उगारली आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्थायी समितीकडे पाठविलेला हा पॉलीसी प्रस्ताव धूळ खात पडेल किंवा फेटाळला जाईल हे निश्चित झाल्याचे मानले जात आहे  . ‘माय मराठी’ ने हा आयुक्तांचा प्रस्ताव नागरिकांची लुट करणारा असल्याने  त्याबाबतच्या बातम्यांद्वारे सातत्याने जागृती करण्याचे धोरण स्वीकारले होते . या प्रस्तावात आयुक्तांनी झोपडपट्टीसह गल्ली बोळात,घरा ,घराबाहेरछोट्या मोठ्या  रस्तोरस्ती उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून हजारोचे पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी स्थायी समिती मार्फत मुख्यसभेची संमती मागितलेली आहे .
आज महापालिकेत आल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी यासंदर्भात माय मराठी शी चर्चा केली .आणि नागरिकांना आधुनिक पद्धतीच्या पुरेश्या पार्किंग लॉट ची सोय महापालिका उपलब्ध करून दिल्याशिवाय रस्त्यावरील पार्किंग शुल्कात वाढ करणे अन्यायकारक ठरेल .त्यामुळे या प्रस्तावाला आपला पाठींबा नसून तशा सूचना आपण महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, आणि याबाबत आयुक्तांना देखील पत्र दिले आहे हे   स्पष्ट केले .
पूवी पुणे हे सायकलींचे शहर होते. ते पुढे स्वयंचलित दुचाकी वाहनांचे शहर बनले .४० लाख पुणेकरांकडे वाहने आहेत . त्यामुळे पार्किंगचा आणि त्याच्या शुल्काचा विषय हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे आम्ही जाणून आहोत .पुढच्या काळात शहरात होणारी वाहनांची वर्दळ किती वाढेल याचा विचार करून पुरेशे पार्किंग लॉट आधुनिक पद्धतीने बांधणे आणि विकसित करणे हि काळाची गरज होती .पण दुर्दैवाने गेल्या २५ वर्षात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. केवळ १९८७ ते १९९२ या कालखंडात काही वाहनतळे झाली.त्यानंतर आरक्षित जागा वापरल्या गेल्या मात्र त्या आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आल्या नाहीत . बहुमजली वाहनतळे तिथे करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. पण भविष्यकाळात महापालिकेवर आर्थिक बोजा न पडता , नागरिकांना बहुमजली वाहनतळे बीओटी तत्वावर उपलब्ध करून देता येवू शकतात .अशी सोय उपलब्ध करून दिल्यानंतर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी  सार्वजनिक शिस्त म्हणून पार्किंग शुल्क वाढवने संयुक्तीक ठरेल .
मात्र अशाप्रकारची कुठलीही सोय उपलब्ध करून न देता पार्किंग शुल्क वाढविणे, आकारणे हे नागरिकांच्या विरोधी असल्याने असा प्रस्ताव भाजप च्या वतीने केला जाणार नाही हे मी स्पष्ट करतो असे ते म्हणाले …. नेमके भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यासंदर्भात काय म्हणाले हे पहा ..ऐका ..त्यांच्याच शब्दात …..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमपुणे : युवा कलाकार...

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत...

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण...