१० कोटीचा गनिमी कावा – सावज कोण अन शिकारी कोण ?

Date:

पुणे :महापालिका हद्दीबाहेर  विकास कामांसाठी पालिकेच्या तिजोरीतून पैसे खर्च करायचे झाल्यास एकूण नगरसेवकांच्या  संख्येच्या निम्म्याहून अधिक मतदानाने अशा पद्धतीची कामे करता येतात . हे नगरसचिवांना  ठाऊक होते .महापौरांना आणि सभागृह नेत्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना ठाऊक होते . मग हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी या गावांमध्ये ड्रेनेज च्या कामासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्याचा  विषय एकट्या मनसेच्या वसंत मोरेंच्या विरोधानेच कसा नामंजूर झाला ?स्थायी समितीत विरोध न करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने आयत्यावेळेला तटस्थ भूमिका घेण्याचे ठरविले काय ?नेमका काय होता हा विषय ? कोणी केला गनिमी कावा ? कोण होते सावज ? आणि कोण झाले होते शिकारी ?या विषयाचा  खोलात जाऊन विचार केला तर हां विषय जलसंपदामंत्री विजय शिवतारे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पर्यंत जावून पोहोचतो आहे ….
हद्दीबाहेरच्या गावांना मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पराभव पदरी घ्यावा लागला. सभागृहात ९८ अशी सदस्यसंख्या असूनही अनेक सदस्य अनुपस्थित असल्यामुळे ही नामुष्की त्यांच्या पदरी आली. असा निधी द्यायचा असेल तर एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांची मंजुरी आवश्यक होती व ती नसल्याने त्यांचा तांत्रिक पराभव झाला.

विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी मतदानाच्या वेळी तटस्थ राहणे पसंत केले .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी एकट्याने या विषयाला विरोध केला. त्यामुळे त्यावर मतदान झाले.
मतदानाच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे ठरावाच्या बाजूने भाजपाच्या उपस्थित सदस्यांची ६८ मते व शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ६ अशी ७४ मते पडली. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ८२ मतांची आवश्यकता होती. त्यामुळे नगरसचिव सुनील पारखी यांनी तांत्रिक कारणामुळे ठराव असंमत असे जाहीर केले.
खरे तर शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांच्या मतदारसंघातील हा विषय ;निसर्ग संपदा नष्ट करत  बेकायदा बांधकामांची बजबजपुरी ,घाणीचे साम्राज्य बनविलेल्या या भागाला ड्रेनेज लाईन ची सुविधा पुरवून अनेक बड्या धेन्दांचे उखळ पांढरे करण्यासाठी सर्वात अगोदर म्हणजे २८ जून २०१७ ला पालकमंत्री गिरीष बापट यांनी या विषयाला गती दिली होती. महापालिकेच्या कात्रज तलावाच्या वरच्या बाजूला पण हद्दीबाहेर मांगडेवाडी, भिलारेवाडी व गुजर निंबाळकरवाडी अशा ग्रामपंचायती आहेत. तेथील मैलापाणी तसेच सांडपणी कात्रजच्या तलावात येते आणि  त्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे असा पद्धतशीर कांगावा करत  त्यासाठी त्या गावांना मलनि:सारण व्यवस्था करून देण्यासाठी म्हणून १० कोटी रुपयांचा निधी महापालिकेने द्यावा, असा विषय पुणेकरांच्या पैशातून खेळून -मांडून येथील मतदानाचे गणित मांडण्याचा हा राजकारण्यांचा प्रयत्न .पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री हे दोघे कितीही सख्य दाखवीत असले तरी एकमेकांचे कट्टर वैयक्तिक विरोधक. केवळ हा प्रश्न पुढे सरकावून आम्हीही मदत करू ,एकत्र राहू चा संदेश बापटांनी दिलेला .२०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पैशातून येथे तुम्हाला मीच ड्रेनेज लाईन देणार असा प्रचार हि शिवतारे आणि स्थानिक नगरसेविका मनीषा कदम यांच्या कडून झालेला .  महापालिकेच्या सभागृहात  राणी भोसले, सुशील मेंगडे, आदी सदस्यांनी त्यावर भाषणेही केली. हा निधी देणे कसे आवश्यक आहे, ती गावे येत्या काही वर्षांत महापालिकेत येणारच आहेत, कात्रजच्या तलावाचे पाणी कसे स्वच्छ राहील, असे बरेच मुद्दे त्यांनी मांडले.
मनसेच्या वसंत मोरे यांनी मात्र एकट्याने या ठरावाला तीव्र विरोध केला. राष्ट्रवादीच्या प्रकाश कदम यांनी याप्रमाणेच  तर आंबेगाव तळ्याचे हि संरक्षण झाले पाहिजे अशी भूमिका मांडली. मोरे म्हणाले  या ग्रामपंचायतींना महापालिका पाणी पुरवते. पाणीपट्टी पोटी त्यांनी एक पैसाही कधी दिलेला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत त्या गावांमध्ये मताला साडेबारा हजार रुपये वाटण्यात आले..
अनधिकृत बांधकामांनी ही गावे गजबजली आहेत. तेथील इमारतींना सांडपाणी, मैलापाणी व्यवस्था नाही. ती करून देण्याचा हा प्रकार आहे. त्याला आपला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबूराव चांदेरे, प्रकाश कदम,  भय्या जाधव यांनी हडपसरमधील पाणीस्रोत असेच आसपासच्या गावांमुळे खराब होत आहेत, तिथेही असाच निधी दिला जाईल का, अशी विचारणा केली. आणि  विषयाला लगेच उपसूचनाही दिली.

उपसूचना आल्यामुळे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची अडचण झाली. ती स्वीकारली तर निधी द्यावा लागेल व नाकारली तर मतदान घ्यावे लागेल, अशा स्थितीमुळे काय निर्णय घ्यावा, अशा पेचात ते सापडल्याचे दिसले .आणि  मोरे विरोध करणार,कॉंग्रेस राष्ट्रवादी तटस्थ रहाणार  हि पडद्यामागील खेळी तेव्हाच स्पष्ट झाली . मतदान होऊन भाजपाचा हा प्रस्ताव तांत्रिक कारणाने रद्द झाला. त्यानंतर बराच वेळ सभागृहात नवीन सदस्य एकत्र येऊन चर्चा करत होते. सोमवारच्या सभेतच अडीच एकरांचा भूखंड मूळ मालकाला परत करण्याच्या ठरावावर भाजपाबरोबर एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी त्याच्या दुसºयाच दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांना त्यांच्याच विषयावर सभागृहातच अस्मान दाखवले.असेच सर्वांना वाटत होते . जर हा विषय पालकमंत्रीबापट यांनीच सर्वप्रथम मांडला  होता  तर तो मंजूर करून घेणे टिळक आणि भिमालेंचे कर्तव्यच होते नव्हे तर प्रतिष्ठेचा भाग होता  . मग हा विषय सभागृहात  असताना त्यांनी भाजपच्याच नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना आदेश दिले नसते काय ?पण असे प्रत्यक्षात काही झाले नाही.आणि सभागृह्नेत्याकडून याबाबत चुकून दुर्लक्ष झाले असते तर आता पर्यंत पालकमंत्र्यांनी त्यांना खडसावले नसते काय ?
या पार्श्वभूमीवर सभागृहात झालेल्या  साऱ्या रंगमंचावरच्या अभिनयाच्या बाबी होत्या असे कोणी म्हटले तर नवल वाटणार नाही .जणू सभागृहनेते  आणि गटनेते जणू सारेच जिंकले होते . मग हार कोणाची झाली होती ? हा प्रश्न जर विचारात घेतला तर याचा फटका सर्वाधिक शिवसेनेला आणि विजय शिवतारेंना च बसल्याचे स्पष्ट होते . बापट -टिळक यांच्या खेळीत शिवतारेंच्या मतदारसंघाला अगोदर  आमिष दाखवून तोंडाला पाने पुसणारा हा प्रकार होता . राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ने त्यासाठी भाजपला साथ दिली, हे जनतेला विशेष वाटेल देखील… पण महापालिका वर्तुळातील राजकीय समीक्षकांना त्याचे नवल वाटणार नाही .अर्थात एका अर्थाने या राजकारणातून ‘गनिमी काव्यातून ‘का होईनात पुणेकरांचे १० कोटी रुपये भलत्याच मार्गाने जाण्याचे टळले हे देखील  यश आहेच . पण हा गनिमी कावा शिवसेनेचे पालिकेतील गटनेते संजय भोसलेंच्या कसा लक्षात आला नाही हेच मोठे आश्चर्य आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...