नाना सांगा …नाव कुणाचे ; महापौर आपल्या पुण्याचे ?

Date:

पुणे- खासदार संजय काकडे म्हणजे होणार तेच ते बोलणार … या उक्तीचा आता उत्कृष्ट प्रचार झाला आहे . आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे , त्यामुळे आता पुण्याचा महापौर कोण ? उपमहापौर कोण ? स्थायी समिती अध्यक्ष कोण ? असे प्रश्न नानांना विचारले जावू लागले आहेत . आणि महापौरपदासाठी तर नानांनी चक्क ..मुक्ता टिळक यांचे नाव घेतल्याने .. मराठा लॉबीला आश्चर्याचा धक्का बसला आहे . मुख्यमंत्री देखील टिळक यांच्याच नावाला पाठींबा देतील असे सांगण्यात येते आहे . अर्थात टिळक घराण्याचे नाव मोठे आहे , जयंतराव टिळक कॉंग्रेसमध्ये होते रोहित टिळक कॉंग्रेस मध्ये आहेत मात्र मुक्ता  टिळक २० वर्षे भाजपमध्ये आहेत . कधी हि कोणत्याही कामाला अडवून ठेवणार नाहीत अशी त्यांची ख्याती आहे आणि ‘राजकारणी’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही हे विशेष .

महापालिकेतील महापौर पदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी आपल्याच माणसाची वर्णी लागावी यासाठी खासदार संजय काकडे सक्रिय झाले असल्याची चर्चा पक्षात असताना आणि त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता असताना महापौर पदासाठी काकडे यांनी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर टिळक याच महापौर पदावर बसण्यास योग्य व्यक्ती आहेत, असे खासदार काकडे यांनी बुधवारी मायमराठी शी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर आणि अन्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली होती. मात्र महत्त्वांच्या पदावर आपल्याच नगरसेवकांची वर्णी लागावी यासाठी खासदार संजय काकडे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे भाजपमध्येच सांगितले जात होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही तास आधी राष्ट्रवादीतून ऐन वेळी भाजपमध्ये आलेल्या रेश्मा भोसले यांनाच महापौर करण्यासाठी काकडे यांनी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...