पुणे-कात्रज ते कोंढवा दरम्यानच्या रस्त्याच्या २१५ कोटीच्या डिफरड पेमेंट पद्धतीच्या कामाचा प्रस्ताव बेकायदा पद्धतीने सभासदांसमोर आणल्याचा आरोप करीत कॉंग्रेस ,राष्ट्रावादी सह मनसे ने आज तो फेटाळून लावला . यावेळी भाजपा या प्रस्तावाच्या बाजूने तर अन्य पक्ष विरोधात असल्याने ३० विरुध्द ७१ अशा मतदानाने तो फेटाळण्यात आला . यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादी मनसे च्या सभासदांनी आपण या रस्त्याच्या कामाच्या विरोधात नसून , हे काम व्हायलाच हवे मात्र त्यासाठी बेकायदा बाबी आणि चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर नगरसेवक आणि आमदार असलेले भाजपचे आमदार या प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी भाषण करू लागले तेव्हा पहा ..नेमका काय प्रकार झाला … सभागृहातील दमबाजी , अरेरावी … आणि प्रतिष्ठा … व्हिडीओ…
भर सभागृहात नगरसेवक भिमालेंकडून सुभाष जगतापांना दमबाजी,जगतापांच्या प्रत्युत्तराने भाजप सदस्यात संताप -अखेर आ.टिळेकरांनी मागितली माफी
Date: