पुणे :
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी त्यांच्या खासदार निधीतून नवा मोमींनपुरा येथील कब्रस्तानच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी सुपूर्त करण्यात आला .
या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला नेहमी वाटते शिक्षण क्षेत्रात देखील माझ्या मुस्लिम तरूण-तरूणींना सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी आपण सगळे व समाजातील जेष्ठांनी पुढाकार घ्यायला हवा. मी यापुर्वी ही अनेक मुस्लिम समाजाच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये माझ्या खासदार निधीतून संगणक दिले आहेत. यापुढच्या काळात देखील शिक्षणासाठी मी नक्कीच निधी देणार आहे. माझे पक्षातील सहकारी समीर शेख व मुस्लिम बांधव यांच्या प्रयत्नांमुळे कब्रस्तानच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी कामाला सुरवात झाली आहे.’