डोबिंवलीमध्ये आगळावेगळा आर्मी डे शानदारपणे साजर
मुंबई, दि. १६ जानेवारी- पाकिस्तान हा देश कधीही सुधारणा नाही. भारताला कसे पाण्यात बघायचे आणि देशाचे तुकडे कसे करायचे यासाठीच त्यांचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांना मिळालेले आहेत त्यांच्या कारवाया कधीही बंद होणार नाहीत. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि एकजूट कायम राहावे लागेल व भारत या देशांच्या कुरापतींना सडेतोड प्रत्युत्तर देईल असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जर्नल संजय कुलकर्णी यांनी केले.
देशात ७५ वा इंडियन आर्मी डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आर्मी डे शानदारपणे साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गणेश मंदिर संस्थान येथे भारतीय सैन्याचे गौरवक्षण आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे भारतीय सैनिक या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यानंतर घरडा सर्कल वरून सैनिकांना अभिवादन करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. मदन ठाकरे चौक येथे कल्याण डोंबिवलीतल्या होतकरू NCC कॅडेट्सची परेड झाली. त्यानंतर फडके रोड येथे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी ‘सियाचेन : काल, आज आणि उद्या’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार, विविसु डेहरा, के. वि. पेंढारकर कॉलेज, भगिनी निवेदिता इंग्लिश स्कुल, ओमकार एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल कुलकर्णी यांनी सांगितले की, अग्निपथ योजना ही देशाच्या भवितव्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे याकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे गरजेचे आहे. देशातील अनेक तरुण – तरुणींना यामध्ये संधी मिळेल, तसेच या योजनेमुळे भारताच्या आर्मीचे वय देखील तरुण राहिल. या सर्व तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे निवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे आपण मेहनत करू आणि यातून देश घडवू असे त्यांनी सांगितले.
देशातील आर्मी ही पाकिस्तान आणि चीन पेक्षाही खंबीर आहे. आपल्याला कोणत्याही सरकारचा दबाव नाही. बाकीच्या देशात राजकीय पक्ष आर्मीमध्ये अधिक हस्तक्षेप करतात, पण आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे आपला देश आर्मीच्या बाबतीत अधिक सक्षम आहे. इतकेच नव्हे तर माझ्या 40 वर्षाच्या नोकरीच्या काळात आणि त्यानंतरही मी अशा पद्धतीचा अनोखा कार्यक्रम पाहिला नाही असेही त्यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक जण शांततेत झोपतो याचे कारण सैनिक आहेत. 1947 ला स्वतंत्र मिळालं. मात्र इंग्रजांनी सैन्य सुपूर्त केले नाही. हे दोन वर्षाने फ्रान्सिस बुचर यांनी सुपूर्त केले. देशात पहिल्यांदा हा आर्मी दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरात साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या अस्तित्वाचा कार्यक्रम आहे. डोंबिवली शहराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. आता ही ओळख देशप्रेमी डोंबिवलीकर अशी देखील होणे गरजेचे आहे. भारत माते बद्दलचा अभिमान आपल्याला प्रत्येकामध्ये प्रेरित करायचा आहे. आपण घेत असलेला श्वास सैनिकांमुळे घेत आहोत याची जाणीव प्रत्येकाला करून द्यायची आहे. सैनिकांची आठवण ठेवून अभिवादन करण्याची प्रथा संपूर्ण देशात डोंबिवलीकरानी प्रथम सुरू केल्याचा मला अभिमान आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, पेंढारकर महाविद्यालय, सिस्टर निवेदिता आणि ओमकार इंटरनॅशनल शाळा या सगळ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. नवी पेंढारकर महाविद्यालय, ओमकार इंटरनॅशनल शाळा आणि सिस्टर निवेदिता शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड सादर केली तर गाडा सर्कल येथे असणाऱ्या शहीद विनय कुमार सच्चान यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना पेंढारकर महाविद्यालयाकडून गार्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला. तर फडके रस्त्यावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती बंद होणार नाहीत पण भारत त्यांच्या कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास सक्षम -निवृत्त लेफ्टनंट जर्नल संजय कुलकर्णी
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/