पुणे- आज सकाळपासून देशभरातील बँक आणि पोस्ट ऑफिसबाहेर लोकांची गर्दीच गर्दी होती .पुणे, .कोलकाता, दिल्ली, मुंबई, बंगळुरु या शहरांसह देशातील विविध शहरांमध्ये जुन्या नोटा जमा करुन पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या . काही बँकांमध्ये नव्या नोटा काल पोहोचणे आवश्यक असतानाही त्या दुपारपर्यंत देखील वेळेवर पोहचलेल्या नव्हत्या . भारतीय रिझर्व बँकेने देशातील सर्व बँक शनिवार आणि रविवारीही सुरु रहातील असे आधीच जाहीर केले आहे.बँकाचे कर्मचारीही अनेक ठिकाणी तणावाखाली आणि ग्राहक ही वैतागलेल्या मनस्थितीत दिसत होते . केवळ दैनदिन खर्चायला पैसे नाहीत म्हणून अनेक जण आपापल्या खात्यातून अगोदर पैसे काढायला प्राधान्य देत होते. आणि नंतर हजार पाचशेच्या आपणाकडील नोटा जमा करण्याकडे लोकांचा कल होता . पण आपल्याच खात्यातील आपलेच पैसे काढण्यावर असलेले निर्बंध अनेकांना अस्वस्थ करीत होते . काही ठिकाणी केवळ २ हजार रुपये चेक वर सेल्फ स्वरूपात घ्यावे लागले तर काही ठिकाणी नोटा आल्यानंतर बराच काल प्रतीक्षा केल्यानंतर चेक वर सेल्फ करून दहा दहा हजारच्या मर्यादेपर्यंत नागरिकांना पैसे दिले गेले . आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही बँकेत जाऊन (जेथे आपले खाते नाही अशा हि ठिकाणी अन्य शाखेत ) 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्यास हि मोठी गर्दी होती