पुणे- पीएमआरडीए च्या निवडणुकीत किती राजकारणाचा बाजार उठवायचा ? कॉंग्रेस ला संख्याबळा नुसार काही मिळत नाही मान्य आहे ..पण म्हणून त्यांना बाजूला हटवून टाकायचे काय ? खायचीच तर शिळी भाकरच खा म्हणून हिणवायचे का ? आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या राष्ट्रीय पक्षानेही त्यांनी टाकलेली शिळी भाकर खायची काय ? असे प्रश्न या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या प्रत्येक हालचालीने उपस्थित झालेले असताना आज मनसे ने देखील यात बॉम्ब टाकून धुराळा उठविला आहे. एकूणच कॉंग्रेस बाबत शहरात राष्ट्रवादी घेत असलेलेया भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. या पूर्वी हि १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्र वादीच्या एका आमदाराच्या हितासाठी एचसीएम टी आर चे आरक्षण उठविण्याचा ठराव भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्रित मतदान करत संमत केला होता . अलीकडच्या वर्षात भाजपा आणि राष्ट्रवादी महापालिकेतील वेगवेगळ्या विषयात एकत्र दिसत असताना कॉंग्रेस मात्र त्यांच्यात देसेनासी झाली आहे . या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्या समवेत सेल्फी घेत फेसबुक वर केलेल्या पोस्ट ने हा धुराळा आणखी उठला आहे . काय म्हटले आहे मोरे यांनी या पोस्ट मध्ये ते जसेच्या तसे खाली वाचा …
तुम्ही फसवा पुणेकरांना फसवा .. .आरे काय राव ,आम्ही पुणेकर तुम्ही भाजपा , राष्ट्रवादी आणि शिवसेना समजता इतकेही वेडे नाहीत.आज काय गुलाल उधळताय , फुगड्या काय घालताय काय तर म्हणे आमचे सर्व उमेदवार निवडून आले.आता एक बघा पुणे आणि पिंपरी चिंचवड मधे PMRDA निवडणुकीत एकूण जागा होत्या २२ त्यामध्ये एकूण संख्या बळानुसार भाजपाचे १४ उमेदवार होते.त्यामधे निवडुन सगळेच आले,जे १००% (गुपित वाटाघाटीनुसार ) येणारच होते आणि राष्ट्रवादीचे होते ७ उमेदवार आणि शिवसेनेचा १ उमेदवार ते ही झालेल्या मांडवलीनुसार १००% येणारच होते.जे आलेही तरीही पुणेकरांना वेडे करण्याकरिता उगाचच गुलाल काय उधळताय…काय काय नाटकं करताय…आरे आम्हाला तुमची ही अंतर्गत युती माहीतच होती…आम्हाला पुणेकरांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना फसवायचे नव्हते म्हणून मी आणि साईनाथ दोघांनीही मतदान केलेच नाही. तुम्ही फसवा पुणेकरांना फसवा…तुम्हाला २०२२ ला पुणेकर पुणेरी दणका १००% देतील…आमचा पक्ष छोटा आहे पण बेईमान नाही.
दरम्यान …..
१२ ऑक्टोबर २०२१ – महापालिकेची मुख्य सभा – या वेळी भाजपा आणि राष्ट्रवादीने हातात हात घालून एकत्रित मतदान करून पहा कसे कॉंग्रेस सह अन्य पक्षांना कसा दिला होता धक्का ..
राष्ट्रवादीने एच सी एम टी आर च्या आरक्षण रचनेत राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या आग्रहार्थ बदल करणारे प्रस्ताव भाजपाला बरोबर घेऊन पहा कसे मंजूर करवून घेतले .