ओतुर – दि.२४ (संजोक काळदंते)
मराठा आरक्षण मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि जलसमाधी घेणार असल्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते मात्र या मोर्चामधील तरुण काकासाहेब शिंदे यांनी खरोखरच जलसमाधी घेतली असल्याने या मोर्चाला तथा आंदोलनाला वेगळे वळन लागले असुन याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत.
ओतुर (ता.जुन्नर) येथे संपुर्ण गाव बंद करुन कडकडीत बंद पाळण्यात आला तर
व्यापार,छोटे- मोठे व्यवसायीक, शेतकरी संपामध्ये सहभागी झाले होते संपुर्ण दिवसभर ओतुर मधील दुकाने कडेकोट बंद ठेऊन मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देत जलासमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या क्रांतीकारी आंदोलकास श्रद्धांजली वाहण्यात आली.
तर या दुःखद घटनेमुळे शोकाकुल वातावरण होते ओतुर मधील सर्वच आर्थिक व्यवहार संपुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते,बाजारपेठेत पुर्ण शुकशुकाट असल्याचे चित्र होते.
कुठलाही हिंसक प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे यांनी सांगितले तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणुन सात जणांवर १४९ च्या नोटीसा देऊन कारवाई करण्यात आली असल्याचे ठाणे अंमलदार के.एम.पाटोळे यांनी सांगितले.ओतुर येथिल बंद शांततेत पार पडला.