बारटक्के दवाखान्यात लवकरच ‘सिटी स्कॅन’ची सुविधा-विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ.

Date:

पुणे – प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी मधील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात लवकरच सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली. दरम्यान, या दवाखान्यात डायलेसिसची सुविधा सुरू करण्यास नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिल्याने, भविष्यात या भागातील सर्वसामान्यांसाठी हे रूग्णालय वरदान ठरणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

धुमाळ म्हणाल्या की, या दवाखान्यात डायलेसीस सेंटर, एक्‍सरे व सोनोग्राफी ची सुविधा लवकरच सुरू करीत आहोत. यामध्ये दहा डायलेसीस बेड्‌स ची व्यवस्था करीत आहोत. या सुविधे मुळे वारजे; कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवा कोपरे -धावडे तसेच कोथरूड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय नियमानुसार अतिशय कमी शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक्‍सरे व सोनोग्राफी ची सुध्दा व्यवस्था करीत आहोत.

या डायलेसीस सेंटर चे लोकार्पण सोहळा लवकरच करीत आहोत की जेणे करून नागरिकांना पुणे शहरात लांबच्या ठिकाणी अथवा खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन जावे लागणार नाही. या उपक्रमा मुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना या केंद्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर याच दवाखान्यात महानगर पालिकेच्या माध्यमातून सिटी स्कॅन मशिन ची व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...