मुंबई- राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर गणेश दर्शनाच्याच निमिताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री , आणि माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांची देखी भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यावर शिंदे यांनी जोशी सर यांची घेतलेली हि दुसरी भेट आहे. मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंच्या नजीकचे आणि पहिल्या फळीतले नेते मानले जातात . दत्ताजी साळवी , साबीर भाई शेख ,प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी यांच्यातील आता केवळ जोशी सर हयात आहेत . छगन भुजबळ आणि नारायण राणे हे सेना सोडून गेलेले आहेत .अशा जुन्या जाणत्या नेत्यांपैकी जोशी यांची भेट एकनाथ शिंदे यांनी पुन्हा घेतल्याने राजकीय पातळीवर या कडे विशेषत्वाने पाहिले जाते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरीही भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. नार्वेकरांच्या घरी यंदाही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी शिंदे-नार्वेकर दोघांमध्ये काही काळ चर्चा रंगली. ही चर्चा नेमकी कशावर होती, हे स्पष्ट झालेलं नाही. भेट गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने असली, तरी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा होणं स्वाभाविक आहे.