नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच), 14 सप्टेंबर 2022 रोजी केंद्रीय मोटार वाहन अधिनियम,1989 अंतर्गत व्यापार प्रमाणपत्र प्रणालीतील सर्वसमावेशक सुधारणांबाबत जीएसआर 703(ई) द्वारे अधिसूचना जारी केली आहे.
विद्यमान नियमांमधे काही विसंगती होत्या. त्यामुळे व्यापार प्रमाणपत्र मिळण्यात अनेक व्यावसायिक आस्थापनांना अडचणींचा सामना करावा लागत असे. याशिवाय, व्यापार प्रमाणपत्रासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणे आवश्यक होते. ती फारच वेळखाऊ प्रक्रिया होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी, व्यापार प्रमाणपत्र प्रणाली सोपी आणि सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत.
नवीन नियमातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.
1.ज्या वाहनांची नोंदणी किंवा तात्पुरती नोंदणी झालेली नाही त्यांनाच व्यापार प्रमाणपत्र आवश्यक असेल. अशी वाहने केवळ वितरक/उत्पादक/मोटार वाहनांचे आयातदार किंवा नियम 126 मध्ये निर्दिष्ट केलेल्या चाचणी संस्थेच्या ताब्यात असू शकतात.
2.थेट आरटीओ कार्यालयात न जाताही, व्यापार प्रमाणपत्र आणि ट्रेड रजिस्ट्रेशन मार्कसाठी वाहन पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अर्ज करता येईल. . अर्जदार एकाच अर्जात अनेक प्रकारच्या वाहनांसाठी अर्ज करू शकतो.
3. व्यापार प्रमाणपत्राच्या मंजूरी किंवा नूतनीकरणासाठी 30 दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. यात 30 दिवसांच्या आत निकालात न काढलेले अर्ज मंजूर मानले जातील.
4. व्यापार प्रमाणपत्राची वैधता 12 महिन्यांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवली आहे.
5. सर्व वितरकांच्या अधिकृततेत एकसमानता आणण्यासाठी (अर्ज16ए)
वितरक अधिकृतता प्रमाणपत्र सादर केले आहे. व्यापार प्रमाणपत्र, वितरक अधिकृतता प्रमाणपत्राशी समकक्ष केले आहे.
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2022/sep/doc2022917105701.pdf