Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून  स्थानिक स्वराज्य संस्थाचं आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

Date:

मुंबई –

ज्ञान ही शक्ती असते, अभिनवता, उद्योजकता, विज्ञान – तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि यशस्वी कार्यपद्धती म्हणजेच ज्ञान आहे,  आणि ज्ञानाचं संपत्तीत रुपांतर करणं हे देशाचं भविष्य आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्सच्या दीक्षांत समारंभ झाला यावेळी गडकरी यांनी   उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ  गव्हर्नन्सचे अध्यक्ष रणजीत चव्हाण, महासंचालक डॉ. जयराज फाटक, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य विजय साने, गोविंद स्वरुप, रवी गुरु, उत्कर्षा कवळी, स्नेहा पळणीटकर हे या समारंभाला उपस्थित होते.

आज पदवी मिळालेले विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून, आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी चांगलं कार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगभरात तंत्रज्ञान सातत्यानं बदलत असल्यामुळे तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड घालणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक पातळीवर होत असलेल्या बदलांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव झाला तर त्यामुळे गूणवत्तापूर्ण बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिका, महानगर पालिकांचे प्रकल्प गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण करायचे असतील तर येत्या काळातल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था जागतिक दर्जाच्या असायला हव्यात, आणि त्यासाठी तंत्रिक आणि आर्थिक पात्रतेचा समावेश असायला हवा असं ते म्हणाले. असं घडल्याशिवाय नगरपालिका, महानगर पालिकांच्या प्रशासनात सुधारणा होऊ शकत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पालिकांची कामगिरी सुधारण्याकरता आर्थिक ऑडिटसोबत कर्मचाऱ्यांच्या कामाचं ऑडिट होणंही तितकंच गरजेचं असल्याचं गडकरी म्हणाले.

येत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून  स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महानगरपालिकांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज आहे, रस्ते बांधणी, कचरा व्यवस्थापन, सांडपणी आणि मलःनिसारण व्यवस्थापन, आणि २४ तास पाणीपुरवठा अशा सगळ्या सेवा उत्तमरित्या पुरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पैशाची बचत आणि अर्थार्जनाचं दुहेरी उद्दिष्ट गाठायला हवं असं गडकरी यांनी सांगितलं. त्यादृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्था  आणि महानगरपालिकांनी परिवहन सेवा, विविध कामांसाठी लागणारी वाहतूक सेवा पूर्णतः इलेक्ट्रिक केली तर पैशांची मोठी बचत होईल असं ते म्हणाले. 

कोणतीही काम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी केवळ शासकीय अनुदावर अवलंबून न राहता, त्यात सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून काम करण्याचा पर्यायही अवलंबला पाहीजे असं ते म्हणाले. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यादृष्टीनं पाहीलं तर, घन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून ५ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहू शकते, आणि त्यातून अर्थार्जनही करता येऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. याच संदर्भानं गडकरी यांनी मथुरा आणि नागपूर महानगर पालिकेत सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरता राबवलेल्या प्रकल्पांची उदाहरणं मांडली.

कोणतीही गोष्ट वा व्यक्ती टाकाऊ नसते आणि टाकाऊ पासून संपत्ती निर्माण करणे हे देखील तितकंच महत्वाचं असल्याचं त्यांना सांगितलं. योग्य नेतृत्व, योग्य दृष्टीकोन, योग्य तंत्रज्ञान आणि योग्य संशोधन असेल तर ही गोष्ट सहज घडवून आणता येते असं त्यांनी सांगितलं. पिकांच्या उरलेल्या अवशेषापासून बायो इथेनॉल आणि बायो बिटोमिन मिळवता येऊ शकतं. त्यामुळे असे आवशेष जाळून होणारं वायुप्रदुषणही टाळता येईल. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आपल्याला हे करायला हवं असं ते म्हणाले.

रस्त्यावरच्या खड्ड्यांपासून मुक्तता मिळवायची असेल तर जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणचे रस्ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून काँक्रिटचे बनवायला हवेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात इतर ठिकाणी केलेले प्रयोग आणि अनुभव त्यांनी मांडले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पठारे यांची मागणी.. पुणे...

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 - मागेल त्याला सौर...