पुणे, 31 ऑक्टोबर 2021: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हा राज्य निवड अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत पुरुष गटात निशीत रहाणे, अर्जुन गोहड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात चौथ्या मानांकित निशीत रहाणेने अव्वल मानांकित प्रसाद इंगळेचा 6-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. तिसऱ्या मानांकित अर्जुन गोहड याने दुसऱ्या मानांकित यशराज दळवीचा 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत प्रथमेश शिंदे व आकाश खैरे यांनी जयदीप पटवर्धनव रक्षय ठक्कर यांचा 6-5(4) असा तर, निशीत रहाणेव अर्जुन गोहडया जोडीने जय पवार व प्रणव गाडगीळ यांचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटात राउंड रॉबिन फेरीत अ गटात अनिशा शेवटेने भक्ती निकालजेचा 6-0 असा तर, दर्शना मुथाने भक्ती निकालजेचा 6-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: पुरुष गट:प्रसाद इंगळे(1)वि.वि.पारितोष पवार 6-2;
निशीत रहाणे(4)वि.वि.जय पवार(10) 6-5(9-7);
अर्जुन गोहड(3) वि.वि.प्रणव गाडगीळ(11)6-1;
यशराज दळवी(2) वि.वि.प्रथमेश शिंदे 6-4;
उपांत्य फेरी:
निशीत रहाणे(4)वि.वि.प्रसाद इंगळे(1) 6-3;
अर्जुन गोहड(3) वि.वि.यशराज दळवी(2) 6-3;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
प्रथमेश शिंदे/आकाश खैरे वि.वि.जयदीप पटवर्धन/रक्षय ठक्कर 6-5(4);निशीत रहाणे/अर्जुन गोहड(2) वि.वि.जय पवार/प्रणव गाडगीळ(3) 6-2;
महिला गट: राउंड रॉबिन: अ गट: अनिशा शेवटे वि.वि.भक्ती निकालजे 6-0;दर्शना मुथा वि.वि.भक्ती निकालजे 6-0;अनिशा शेवटे वि.वि.दर्शना मुथा 6-0;गट ब: ख़ुशी घोडे वि.वि.अनघा नायर 6-0;
दिपशिखा कलाटे वि.वि.ख़ुशी घोडे 6-4;तन्वी तावडे वि.वि. दिपशिखा कलाटे 6-2;