नवी दिल्ली-मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स कायम असून आज दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काही म्हणणे असेल तर लेखी उत्तर द्या असे निर्देश दोन्ही गटाला दिले. सोमवारी (२३ जानेवारी रोजी) याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर ३० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कामत – जेठमलानी यांच्यात खडाजंगी
युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला. कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली व देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण ऐकून घेऊ असे आयोगाने म्हटले.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा युक्तिवाद
उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली?
युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिलं
आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही
मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे
पक्षघटनेचं आम्ही पालन केलं आहे.
शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूटच
शिवसेना पक्षाच्या घटनेचे आम्ही पालन केले.
शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूट. मुख्यनेतापद कायदेशीर.
लोकसभा, विधानसभा सदस्यसंख्या बघता चिन्ह आम्हालाच द्या.
प्रतिनिधी सभा नव्हे लोकप्रतिनिधी महत्वाचे.
दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.