पुणे- महापालिकेची आजची खास सभा बोलाविली होती भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन . या सभेत राष्ट्रवादी आणि भाजपची हात मिळवणी एकदम स्पष्ट दिसून आली .कॉंग्रेस बरोबर मनसे ,शिवसेना यांनी या भाजपा- राष्ट्रवादीने एकत्रित आणलेल्या २ प्रस्तावांना कडाडून विरोध केला आणि नंतर मतदानाने राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येऊन हे प्रस्ताव मंजूर करवून घेतले. या संदर्भात हि खास सभा होण्यापूर्वीच केवळ ‘माय मराठी ‘ ने याबाबतचा पर्दाफाश केला होता . अखेरीस तसेच या सभेत दिसून आले .आपण पहा आणि ठरवा हि एकी कशी का झाली ?
त्यापूर्वी पहा नेमके ते २ प्रस्ताव काय होते – एक विषय एचसीएमटीआर च्या मार्गिकेत बदल सुचविणारा आहे. महापालिकेच्या १९८७ च्या डीपी प्रस्तावामध्ये एचसीएमटीआर प्रस्ताव तयार करण्यात आला .सदर प्रस्तावात बाधित होणाऱ्या इमारतींचा विचार करून मार्गिका करण्यात आली होती.पण त्या सुधारित आखणीनुसार देखील आता स्वारगेट येथील पर्वती सर्वे नंबर ३३ अ /२ सिटी सर्वे नंबर ६६१५ फायनल प्लॉट नंबर ४९० (पैकी ) हि मिळकत बाधित होत असल्याने सदरचा रस्ता उत्तर दिशेकडे सरकवून करावा असा भाजपच्या एका वरिष्ठ नगरसेवकाचा प्रस्ताव आहे . दुसरा खास विषयदेखील असा आहे कि ,’याच एचसीएमटीआर च्या मार्गिकेत ३ ठिकाणी बदल करणार आहे. कोथरूड गांधी लॉन्स ते अलंकार पोलीस चौकी दरम्यान मार्गिकेत बदल करणे तसेच वडगाव शेरी येथे बदल करणे आणि तसेच सर्वे नंबर २२७ /ए /२२७ /१ ते १७ लोहगाव येथील मार्गिकेत बदल करणे असा आहे मात्र हा विषय महापालिका आयुक्तांनी आणलेला आहे.