Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघ हजारी प्रमुखांसाठीच्या कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद

Date:

 
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुक 2017 च्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हजारी यंत्रणा प्रमुख (हजार मतदारांच्या संपर्कातील प्रमुख कार्यकर्ता) यांच्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आयोजित कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
पर्वती  विधानसभा मतदारसंघातून एकशे अठ्ठावीस हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली .
    ही  कार्यशाळा १८ जानेवारी रोजी सायंकाळी  रासकर पॅलेस , बिबवेवाडी येथे झाली.
यावेळी अॅड .म . वि . अकोलकर पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे  यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले.


शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अॅड .म . वि . अकोलकर  पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या  समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे ,  पार्वती  विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत तापकीर ,नगरसेवक विनायक हनमघर ,शिवलाल भोसले , माजी नगरसेवक श्याम मानकर , आबा रासकर , सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे , मृणालिनी वाणी यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे , ओळख पत्रे देण्यात आली.
यावेळी खासदार  आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला . ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा . दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल ‘ चे कार्य अचूक करावे . विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
अॅड .म . वि . अकोलकर मार्गदर्शन करताना म्हणाले ,’ हजारी प्रमुख हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा असतो. पक्षाची ध्येय ,धोरणे , काम थेट मतदारांपर्यंत पोहचविणारा महत्वाचा दुवा असतो. हजारी प्रमुखांचे काम हे महत्वाचे असते. त्यांनी चांगले काम केले तर त्याचा फायदा निश्चितच पक्षाला होतो. त्यासाठी सर्वानी झटून काम केले पाहिजे ‘.
पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे  यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. हजारी प्रमुखांच्या  कामाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले , ‘ मतदार संघातील पक्षाने नेमलेल्या जबाबदार कार्यकर्त्यांनी प्रथम जुनी यादी मिळवावी , त्याचा अभ्यास करावा , मतदारसंघाचे विभाग पाडावेत, अश्या वेगवेग्ळ्या याद्या करून त्याप्रमाणे नियोजन करून मतदारांच्या भेटी घ्याव्यात’.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

https://youtube.com/shorts/zq2TKqem9-Q गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते...

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...