कसबा विधानसभा मतदारसंघातून दोनशे वीस हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली .
आज या कार्यशाळेचा कसबा विधानसभा मतदारसंघात, सावतामाळी भवन कार्यालय येथे शुभारंभ झाला.पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अॅड . भगवानराव साळुंखे , पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे , रजनीताई पाचंगे, कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुरेश बांदल, कसबा विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्ष वनिता जगताप यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे , ओळख पत्रे देण्यात आली. किरण कद्रे यांनी सूत्रसंचालन केले . युसूफ शेख आणि हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला . ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा . दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल ‘ चे कार्य अचूक करावे . विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे