Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मेट्रो भूमिपूजन म्हणजे पुणेकरांची शुध्द फसवणूक-खा. चव्हाण

Date:

पुणे :
मेट्रोच्या मार्गाबाबत हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) प्रलंबित असलेल्या याचिकेकडे दुर्लक्ष करून, किंबहुना राजकीय फायद्यासाठी पुण्यातील मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा घाट घातल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे.
खा. चव्हाण म्हणाल्या, मेट्रोच्या नदीपात्रातील मार्गाबाबत आक्षेप घेणारी याचिका हरित न्यायाधिकरणाकडे मे २०१६ मध्येच दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात अंतिम सुनावणी २ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येईल असे न्यायाधिकरणारने २१ डिसेंबर २०१७ रोजी सांगितले होते. या सगळ्याची पूर्ण कल्पना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू होती. असे असूनही केवळ महापालिका निवडणूका समोर ठेवून मेट्रोच्या भूमिपूजनाचे नाटक घडवून आणले. आधीच्या सरकारने ठेवलेल्या कथित २५० त्रुटी दूर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या भूमिपूजनाच्यावेळी दिली मात्र, हरित न्यायाधिकरणासमोरील याचिकेची माहिती `अभ्यासू’ मुख्यमंत्र्यांनी हेतूतः दडवून ठेवली, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली. 

त्या म्हणाल्या, मेट्रो संदर्भात यापुर्वी ही राज्य व केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकांमध्ये हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचीची पायमल्ली होत असल्याचे मी निदर्शनास आणून दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष करत राज्य व केंद्र सरकारने हरित लवादाच्या याचिकेला हरताळ फासला. पुण्यातील अनेक पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी न्यायालयात देखील दाद मागीतली होती. ज्येष्ठ उद्योजक आणि राज्यसभेच्या सदस्या अनु आगा, पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद सारंग यादवडकर आणि आरती किर्लोस्कर अशा अभ्यासू व्यक्तींनी ही याचिका दाखल केली होती. नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गावर आणि नदीपात्रात बांधल्या जाणाऱ्या मेट्रो स्थानकांवर NGT कडे प्रलंबित असलेल्या याचिकेत आक्षेप घेण्यात आला होता. विशेष म्हणजे नदीपात्रातील बांधकामांबाबत न्यायाधिकरणाने वेळोवेळी सरकारला मार्गदर्शक सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात खेद व्यक्त केला आहे. हरीत न्यायाधिकरणाचे म्हणणे ऐकून घेण्याच्या आधीच भूमिपूजनाचा कार्यक्रम करणे म्हणजे पुणेकरांची शुद्ध फसवणूक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...