पुणे :
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी पक्षाने आज मुलाखतींना प्रारंभ केला. इच्छुक २४० उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या .
आज १७ डिसेंबर रोजी निसर्ग मंगल कार्यालय (गुलटेकडी मार्केट यार्ड ) येथे सकाळी साडे आठपासून खडकवासला ,शिवाजीनगर ,कोथरूड ,वडगाव शेरी या विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक उमेदवारांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारले . इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले . इच्छुक महिला उमेदवारांची आणि तरुण इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती . मार्केट यार्ड परिसर आज इच्छुक उमेदवार , त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने राष्ट्रवादीमय झाला होता.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले , आमदार ऍड जयदेवराव गायकवाड ,महापौर प्रशांत जगताप , माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, सभागृह नेते शंकर केमसे, स्थायीसमिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके , माजी आमदार बापू पाठारे, कुमार गोसावी , कमल ढोले-पाटील , अण्णा थोरात , रवींद्र माळवदकर , प्रवक्ते अंकुश काकडे , अशोक राठी, श्रीकांत पाटील , माजी महापौर दत्ता धनकवडे , काका चव्हाण, रुपाली चाकणकर , हर्षदा वांजळे , राकेश कामठे, पंडित कांबळे , इक्बाल शेख , ऋषी परदेशी , मिलिंद वालवाडकर , शैलेश बडदे , दादासाहेब गलांडे , प्रकाश म्हस्के यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या.
उद्या १८ डिसेंबर रोजी येथे सकाळी साडे आठपासून रासकर पॅलेस( बिबवेवाडी ) येथे पर्वती ,कसबा ,हडपसर ,कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील .