पुणे-वीजभारनियमन व दरवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.वंदना चव्हाण व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संत कबीर चाैक ते रास्ता पेठ पाॅवर हाऊस येथे भव्य ” *कंदील मोर्चा ” काढुन सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या गेल्या चार वर्षांपुर्वी जनतेला खोटी आश्वासने देउन हे सरकार सत्तेवर आले या आश्वासनामधील एक ही आश्वासन हे सरकार पुर्ण करु शकलेले नाही . सतत जनतेला खोट बोलत रहायचे अशी पध्दत या सरकारने चालविली आहे, एन सणासुदिच्या काळात गॅस , महाग, अन्नधान्य महाग ,पेट्रोल, डीझेल महाग व आता विज सुध्दा महाग करण्याचा पराक्रम या सरकारने केला आहे या सरकार चा करावा तेवढा निषेध कमीच आहे. नोटाबंदी, गॅस बंदी,आता विजबंदी पुढच्या वर्षी जनता कमळ बंदी केल्याशिवाय राहणार नाही अशी सडकुन टिका खा. वंदना चव्हाण यांनी केली.
ऐन सनासुदीच्या काळात जनतेला आणि राज्याला अंधाराच्या खाईत या अकार्यक्षम भाजपा – शिवसेना युती सरकारने लोटलेले आहे , अघोषित असे लोडशेडिंग राज्यात चालु असुन जनतेला त्याबरोबर विज दरवाढीचा शोक दिला जातोय . आपण सत्तेवर आलो त्यावेळी कोळशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते , शेजारील गुजरात सरकारला कोळसा मिळतोय आणि आपल्याला महाराष्ट्राला कोळसा उपलब्ध होत नाही, याचा अर्थ महाराष्ट्रातील तमाम जनतेने काय घ्यायचा ? सरकारच्या या गलथान कारभारा विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने भव्य कंदिल मोर्चा काढण्यात आल्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी सांगितले . याप्रसंगी बापु पठारे, मोहनसिंग राजपाल,रवींद्र माळवदकर,नगरसेवक वनराज आंदेकर ,लक्ष्मीताई आंदेकर,प्रदिप गायकवाड,अशोक कांबळे, भैय्या जाधव, भगवान साळुंखे,श्रीकांत पाटील, निलेश निकम ,भोलासिंग अरोरा, नितीन कदम, विनायक हनमघर, प्रदिप देशमुख,फहिम शेख ,रमेश आढाव,महेश हांडे,किशोर कांबळे, दत्तात्रेय तुपे, अनिस सुंडके, हसिना ईनामदार ,बाळासाहेब तुपे ,गणेश ससाणे,दिनेश मोरे, विक्रम जाधव,विशाल मोरे ,प्रेम भांडे पाटिल,संतोष नांगरे ,शरद दबडे, मृणालिनी वाणी ,श्वेता होणराव,उज्वला देशकर,अजिमभाई गुडाकुवाला, विशाल नाटेकर , शांतिलाल मिसाळ,मीनाताई पवार,संजय लोणकर, युसुफ शेख ,
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .