कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना ‘फाशी’ हा निर्णय अपेक्षितच होता. सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा Rarest of rare case मध्ये व्हावी अशी संकल्पना मांडली होती. कोपर्डी घटनेत निरपराध मुलीवर झालेला बलात्कार आणि खून हे या कक्षेत बसत असल्याने नराधमांना हि शिक्षा ठोठावणे योग्यच आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. परंतु गेलेल्या जीवामुळे कुटुंबियांच्या जीवनात निर्माण झालेले दुःख आणि पोकळी भरून येणार नाही. तसेच अशा प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा हि अजूनही दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांमध्ये भीती निर्माण करत नाही ही गंभीर बाब आहे. असे कृत्य घडू नये या साठी शासन अजूनही ठोस पावले उचलत नाही हि मोठी शोकांतिका आहे.
– खासदार वंदना चव्हाण