ईस्ट स्ट्रीटवरील नव्या टचपॉइंटमुळे पुण्यातील महिंद्रा सुविधा केंद्रांची संख्या ८ वर; ग्राहकांना ICE आणि EV वाहनांचा प्रीमियम अनुभ
पुणे | प्रतिनिधी
भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल रिटेल समूहांपैकी एक असलेल्या पीपीएस मोटर्सने पुण्यातील कॅम्प परिसरात महिंद्राचे नवीन अत्याधुनिक शोरूम सुरू करून महाराष्ट्रातील आपला विस्तार अधिक मजबूत केला आहे. ईस्ट स्ट्रीट येथे सुरू करण्यात आलेले हे शोरूम पीपीएस समूहाचे भारतातील १४९ वे महिंद्रा टचपॉइंट ठरले आहे.
या नवीन सुविधा केंद्राचे उद्घाटन महिंद्रा अँड महिंद्राचे नॅशनल सेल्स हेड अमन मलिक, झोनल सेल्स हेड (पश्चिम) गौरव बेओहर, रिजनल सेल्स मॅनेजर प्रभाकर जक्कन, पीपीएस ग्रुपचे पाक्षल शाह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
सुमारे ३,६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या शोरूममध्ये एकावेळी पाच वाहनांचे प्रदर्शन करता येणार असून महिंद्राच्या पेट्रोल, डिझेल तसेच इलेक्ट्रिक (EV) वाहनांच्या संपूर्ण श्रेणीचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. आधुनिक इंटिरिअर, डिजिटल तंत्रज्ञान, आकर्षक प्रकाशयोजना आणि ग्राहकाभिमुख सुविधा यामुळे वाहन खरेदीचा दर्जेदार अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.
यावेळी पीपीएस ग्रुपचे डीलर प्रिन्सिपल राजीव संघवी म्हणाले की, महिंद्रासोबतच्या दीर्घकालीन भागीदारीला या नव्या शोरूममुळे आणखी बळ मिळाले आहे. ग्राहकांचा विश्वास, उत्कृष्ट सेवा आणि भविष्यातील तंत्रज्ञान यावर भर देत सर्वोत्तम वाहन मालकीचा अनुभव देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटनानंतर पीपीएस मोटर्सचे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये १४९ महिंद्रा टचपॉइंट्स झाले आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीने सुमारे ४१,५०० महिंद्रा वाहनांची विक्री केली असून भारतातील महिंद्राचा सर्वात मोठा विक्री व विक्रीनंतरचा सेवा भागीदार म्हणून स्थान अधिक मजबूत केले आहे.
कॅम्पमधील हे शोरूम पुण्यातील पीपीएस मोटर्सचे आठवे महिंद्रा टचपॉइंट असून त्यामध्ये सात शोरूम आणि एक वर्कशॉपचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत पुणे विभागात कंपनीने ६,२०० हून अधिक महिंद्रा वाहनांची विक्री केली आहे.
दरम्यान, पुण्यातील प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेतही सातत्याने वाढ होत आहे. २०२५ मध्ये शहरात ७४,८१४ नवीन वाहनांची नोंदणी झाली असून इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. त्यामुळे भविष्यातील वाढत्या मागणीचा विचार करून पीपीएस मोटर्सने पुण्यातील आपले जाळे आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे.

