मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

Date:

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५ दिवसांत दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मोशी येथील कचरा डेपोवर झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता (पर्यावरण) योगेश सोपान आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिले आहेत.

८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून शेजारील आरसीसी इमारतीवर पडला होता. या भीषण दुर्घटनेत नऊ कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.

मात्र, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सादर केलेले खुलासे समाधानकारक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांच्या स्पष्टीकरणात वस्तुस्थितीचा अभाव असून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाल्याचे निरीक्षण नोंदवत प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली.

महापालिकेच्या आदेशानुसार, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी मोशी कचरा डेपोच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण व पर्यवेक्षण ठेवले नाही, सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आणि कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर पर्यावरणीय नियमांच्या अंमलबजावणीत त्रुटी, आवश्यक देखरेखीचा अभाव आणि कामकाजातील गंभीर निष्काळजीपणा केल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश दिले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकारी निलंबित राहणार आहेत. निलंबनाच्या कालावधीत त्यांना शासकीय नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणताही अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर आणखी कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेमागील नेमकी कारणे, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासकीय जबाबदारी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मार्ट मीटरबाबत पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती

७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमधील १ लाख ६६ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट संवाद पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडलातील विविध मंडलांचे अधिकारी व कर्मचारी दररोज विविध गृहनिर्माण सोसायट्या, निवासी परिसर आणि ग्राहकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देत आहेत. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे. पुणे परिमंडलात जुलै महिन्यात तब्बल ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १,२७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरविषयी माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुणे शहरात दोन ‘एलईडी व्हॅन’ गर्दीच्या ठिकाणी फिरत असून, त्याद्वारे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती व फायद्यांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवून ग्राहकांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट मीटरचे प्रमुख फायदे दिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...